RRR Sold Out | प्रदर्शनापूर्वीच ‘आरआरआर’ची बक्कळ कमाई, कोट्यावधी रुपयांत विकले गेले ‘पोस्ट रिलीज’ हक्क!

दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajmouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

RRR Sold Out | प्रदर्शनापूर्वीच ‘आरआरआर’ची बक्कळ कमाई, कोट्यावधी रुपयांत विकले गेले ‘पोस्ट रिलीज’ हक्क!
आरआरआर
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 12:28 PM

मुंबई : दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajmouli) यांच्या आगामी ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, तेव्हापासून चाहते त्याच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरआरआरचा फर्स्ट लूकही चाहत्यांसाठी आता सादर करण्यात आला आहे. नुकतीच या चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे (RRR Sold Out SS Rajamouli sold RRR movie theatrical rights).

मोठी आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या व्यवसायाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. या डीलचा आकडा ऐकून प्रत्येकजण आश्चर्यचकित होणार आहे. तब्बल कोट्यवधी रुपयांमध्ये या चित्रपटाचे हक्क विकण्यात आले आहेत.

कोट्यावधी रुपयांत विकले हक्क

पिंकविलाच्या वृत्तानुसार, आरआरआरचे निर्माते आणि वितरकांनी चित्रपटाच्या डिजिटल, उपग्रह आणि इलेक्ट्रॉनिक हक्क विक्री करारावर सही केली आहे. बातमीनुसार हिंदीतील चित्रपटाचे थियेट्रिकल रिलीज 140 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. चित्रपटाचे हक्क कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्याचे बोलले जात आहे. बातमीनुसार, झी ग्रुपला आरआरआर जाहीर झाल्यानंतर निर्मात्यांनी उपग्रह आणि डिजिटल हक्क (सर्व भाषा) 325 कोटी रुपयांना विकले आहेत.

तथापि, निर्मात्यांनी कोणत्याही प्रकारच्या हक्क विक्रीच्या मुद्द्यावर अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही. अशा परिस्थितीत हा करार खरोखर निश्चित झाला आहे की नाही, हे आपण सांगू शकत नाही.

आणखी 200 कोटींचा करार

अशा परिस्थितीत पिंकविलाच्या अहवालानुसार एस.एस. राजामौली आणि जयंतीलाल गाडा यांच्यात नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्ससाठी विशेष करार झाला आहे. बॉलिवूड स्टुडिओने हिंदी डब सॅटेलाईट, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक हक्क यासह सुमारे 200 ते 210 कोटी रुपयांच्या करारास अंतिम मान्यता दिली आहे. व्यापारिक स्त्रोतानुसार जयंतीलाल गडा यांनी हिंदी आवृत्तीच्या सॅटेलाईट, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक हक्कांमध्ये 50% भागीदारी घेतली आहे. याचा अर्थ असा की, जर चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 100 कोटींची कमाई केली, तर जयंतीलाल यांना थेट 50 कोटी मिळतील (RRR Sold Out SS Rajamouli sold RRR movie theatrical rights).

या चित्रपटाचे आतापर्यंतचे डील पाहता या हक्कांची किंमत 200 कोटी रुपये ठेवली गेली होती, परंतु नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स 140 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहेत. राजामौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा करार असल्याचे म्हटले जाते आहे

‘फार्स फिल्म्स’ सोबत डील

एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली.

केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी या चित्रपटाला आतापर्यंत 348 कोटीहून अधिक ऑफर मिळाल्या आहेत. जेव्हापासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून चित्रपटाला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. निजाममध्ये 75 कोटी, आंध्र प्रदेशात 165 कोटी, तामिळनाडूमध्ये 48 कोटी, मल्याळममध्ये 15 कोटी आणि कर्नाटकमध्ये 45 कोटी हा सर्व आकडा मिळून 348 कोटी रुपये होत आहे. तसेच या चित्रपटाला बॉलिवूडकडून देखील मोठ्या ऑफर्सही मिळत आहेत.

(RRR Sold Out SS Rajamouli sold RRR movie theatrical rights)

हेही वाचा :

‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’ फेम प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’ विजय पाटील यांचं निधन

‘TVF Aspirants’ सीरीज वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने केला मोठा आरोप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.