रुपाली गांगुलीच्या मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना, नेमकं काय घडलं ?

स्टार प्लसची मालिका अनुपमाच्या सेटवरून एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. या मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या क्रमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनुपमाचा सेट फिल्मसिटी, गोरेगाव, मुंबई येथे आहे. मात्र, या वृत्ताला चॅनल किंवा सीरियल प्रोडक्शनकडून कोणतेही दुजोरा देण्यात आलेला नाही.

रुपाली गांगुलीच्या मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना, नेमकं काय घडलं ?
टीव्ही मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटनाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 10:06 AM

स्टार प्लस वरील मालिका ‘अनुपमा’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी रुपाली गांगुली सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. त्याचवेळी तिच्या प्रोफेशनल आयुष्यातही मोठी घटना घडली अनुपमा मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे, त्यामध्ये एक कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला हा इसम स्टार प्लस च्या ‘अनुपमा’ या शोसाठी कॅमेरा असिस्टंट म्हणून काम करत होता. मात्र तेथे वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर टीव्ही ९च्या टीमने चॅनल आणि प्रोडक्शन या दोन्ही प्रवक्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूंनी या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

बिहारचा रहिवासी होता कॅमेरामन

गुरूवारी, 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ‘अनुपमा’ च्या सेटवर ही कथित दुर्घटना झाली. मालिकेचे शूटिंग सुरू असताना कॅमेरा असिस्टंटच्या पायाला वीजेचा शॉक लागला. या घटनेची माहिती मुंबईतील आरे कॉलनी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मालिकेच्या सेटवर जाऊन चौकशीही केली. मात्र राजन साही यांच्यातर्फे या घटनेसंदर्भतात अद्याप कोणतीही अधिकृत स्टेटमेंट जाहीर करण्यात आलेले नाही.

खरंतर या मालिकेसाठी वापरलेले कॅमेरे हे थर्ड पार्टी म्हणजेच इतर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असतात आणि या कॅमेऱ्यासोबत सेटवर कॅमेरा असिस्टंटही असतात. कॅमेरा आणि कॅमेरा असिस्टंट दोन्ही थर्ड पार्टीकडून येतात. कॅमेरा असिस्टंटची सुट्टी असेल तर त्या दिवशी कंपनीतर्फे दुसरा कॅमेरा असिस्टंट दिला जातो. अनुपमाच्या शूटिंगसाठी ‘साई व्हिडिओ’ कंपनीचे कॅमेरे वापरले जातात. कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूनंतर साई व्हिडीओने त्याच्या कुटुंबीयांना काही रक्कम भरपाई म्हणून दिली आहे आणि त्याचे पार्थिव बिहारमधील त्याच्या घरी नेण्याचा खर्चही कंपनी उचलत आहे.

मुंबईत आला मृताचा भाऊ

मिळालेल्या माहितीनुसार, मृत कॅमेरा असिस्टंटचा भाऊ सध्या मुंबईत आला आहे. तो आपल्या भावाचे पार्थिव बिहारमधील त्यांच्या घरी घेऊन जाईल, जेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कॅमेरा असिस्टंटच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची अवस्था अतिशय वाईट झाली असून ते शोकाकुल आहेत. मात्र, या घटनेसंदर्भात चॅनल आणि प्रॉडक्शन हाऊसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

टीव्हीची नंबर 1 मालिका

रुपाली गांगुलीची प्रमुख भूमिका असलेली ‘अनुपमा’ ही स्टार प्लसची नंबर वन मालिका आहे. सध्या या मालिकेत तिसरी लीप आली आहे. रुपाली गांगुलीसोबत गौरव खन्ना या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ सारख्या आयकॉनिक शोची निर्मिती करणारे राजन शाही या प्रसिद्ध टीव्ही मालिकेचे निर्माते आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.