2 लग्नं, 13 वर्षात एकही चित्रपट नाही, तरी आलिशान आयुष्य जगतो हा अभिनेता ; करतो तरी काय ?
बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नाव अडकलेल्या साहिल खान याला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली. या अभिनेत्याने स्टाइल चित्रपटातून करिअर सुरू केलं होतं. पण गेल्या 13 वर्षांपासून तो चित्रपटांपासून दूरच होता. नुकताच तो त्याच्या दुसऱ्या लग्नामुळेही चर्चेत आला होता.
बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता साहिल खान हा अडचणीत सापडला आहे. त्याला महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. द लायन बुक ॲपशी संबंधित असल्याचा आरोप त्याच्यावर होता. हे ॲप म्हणजे महादेव बेटिंग ॲपचाच एक भाग आहे. त्याच्या लाँचिंगलाही साहिल खान उपस्थित होता आणि त्याने त्याचे प्रमोशनही केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला छत्तीसगड येथून अटक केली. साहिल खानचे नाव हे त्याच्या कामामुळे कमी आणि वादांमुळेच जास्त ऐकू येतं. नुकताच तो त्याच्या दुसऱ्या लग्नामुळेही चर्चेत आला होता.
कुठे झाला जन्म ?
5 नोव्हेंबर 1976 रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे साहिल खानचा जन्म झाला. पण तो दिल्लीत लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील भारतीय मुस्लिम आणि आई चिनी ख्रिश्चन होती. अत्यंत गरिबीत त्याचं बालपण गेलं. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अवघ्या 15 व्या वर्षी घरातून पळून मुंबईला गेला. त्याला एक व्यावसायिक बॉडीबिल्डर बनायचं होतं.
चित्रपटात कशी झाली एंट्री ?
साहिल मॉडेलिंगशी निगडीत होता. त्या काळी बरेच म्युझिक व्हिडीओ , अल्बम निघाले. असाच एक म्युझिकल व्हिडिओ स्टिरिओ नेशनने रिलीज केला, ज्यातील गाण्याचं नाव होते नाचेंगे सारी रात. या नंतर साहिलची दखल घेतली जाऊ लागली आणि त्याचे नशीब बदलले. एन चंद्रा यांनी स्टाईल चित्रपटात साहिलला मुख्य भूमिका दिली. हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता आणि लोकांना खूप आवडलाही . पण त्यानंतर त्याचं करीअर फारसं चाललं नाही. यानंतर त्याने एक्सक्यूज मी, यही है जिंदगी, डबल क्रॉस, अलादीन आणि रामा द सेव्हियर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. गेल्या 13-14 वर्षांपासून तो एकाही चित्रपटात झळकलेला नाही.
लहानपणीचं स्वप्न झालं पूर्ण
त्याची फिल्मी कारकीर्द फार काळ टिकली नसली तरीही त्याने त्याच्या कारकिर्दीत हवे ते स्थान मिळवले. तो फिटनेस ट्रेनर बनला. सोशल मीडियाच्या जमान्यात त्याचा व्यवसाय आणखी वाढला आणि त्याच्याकडे फिटनेस आयकॉन म्हणून पाहिले जाऊ लागले. YouTube वर त्याच्या चॅनलचे 3.17 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. याशिवाय इंस्टाग्रामवर अभिनेत्याचे10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तरुणांना फिटनेसबद्दल जागरूक करण्यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
केली 2 लग्नं
साहिल खानने 2003 मध्ये इराणी अभिनेत्री आणि मॉडेल नेगर खानशी लग्न केले. पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दोघांचा 2 वर्षात घटस्फोट झाला आणि 2005 साली ते वेगळे झाले. यानंतर साहिल खानने 2024 मध्ये मिलेना नावाच्या महिलेशी लग्न केले. या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती. सध्या तो महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अडकला असून तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला कोर्टाने 1 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.