सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून कुटुंबियांची विचारपूस, नेमकं काय घडलं? संपूर्ण माहिती समोर

वांद्र्यातील राहत्या घरात सैफ अली खानवर चोराने चाकू हल्ला केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. 

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून कुटुंबियांची विचारपूस, नेमकं काय घडलं? संपूर्ण माहिती समोर
supriya sule saif ali khan
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 9:27 AM

 Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चोराने चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. घरात शिरलेल्या एका चोराने सैफ अली खानवर चाकूने ६ वार केले. या सैफ अली खान हा गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानवर मध्यरात्री 3 च्या सुमारास ही घटना घडली. वांद्र्यातील राहत्या घरात सैफ अली खानवर चोराने चाकू हल्ला केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली.

खासदार सुप्रिया सुळे या बारामतीत एका कार्यक्रमासाठी गेल्या आहेत. त्यावेळी त्यांना याबद्दलची माहिती समजली. यानंतर त्यांनी सैफ अली खानची मेहुणी अभिनेत्री करिश्मा कपूरशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी कुटुंबियांच्या प्रकृतीची चौकशी केली. सैफ अली खान हे सध्या सुरक्षित आहेत. ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती आल्यानतंरच यावर बोलणं योग्य ठरेल, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

सुप्रिया सुळे आणि करिश्मा कपूर यांच्यातील संवाद

“सर्व ठीक आहे का? मग करीना आता रुग्णालयात आहे का? अच्छा म्हणजे तुम्ही झोपलेले असतानाही ही घटना घडली. किती धक्कादायक घटना आहे. मी काही करु की पोलीसांना तुम्ही तक्रार केली आहे आणि ते आले आहेत. मला खरंच माफ कर मी तुला इतक्या सकाळी फोन केला. मी माझ्या मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा मला समजलं. यानंतर मी सैफला फोन केला, त्यानंतर मी तुमच्या कुटुंबाला फोन केला पण कोणीही उचलला नाही. त्यामुळे मी तुला फोन केला”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यानंतर सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरला आई-वडिलांना (रणधीर कपूर-बबीता कपूर) इतक्या काही सांगू नकोस, असे सांगितले. यानंतर सुप्रिया सुळेंनी “तो चोर घरात कसा शिरला, किती धक्कादायक आहे हे, असे म्हटले. सैफ आणि करीनाची काळजी घे आणि मला काय होतंय ते कळवं. काळजी घ्या. माझी काही मदत लागली तर तेही सांग. सैफ हा घरी आहे का, तो रुग्णालयात आहे का, मग त्याची प्रकृती कशी आहे, खूप खूप प्रेम, काळजी घ्या”, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले.

कुटुंबाकडून अधिकृत माहिती आल्यानतंर बोलणं योग्य

यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. “मी त्यांच्या कुटुंबाशी बोलली. त्यांच्या कुटुंबियांची गोपनियता महत्त्वाची आहे. त्यांच्याकडून लवकरच अधिकृत पत्रक काढलं जाईल. पोलीसही याबद्दल सविस्तर सांगतील. याबद्दल अधिकृतरित्या सविस्तर माहिती आल्यानंतर बोलणं योग्य राहील. सैफ अली खान हे सध्या सुरक्षित आहेत. ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती आल्यानतंरच यावर बोलणं योग्य ठरेल”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.