पती Saif Ali Khan वर झाला हल्ला, तेव्हा या 3 व्यक्तींसोबत पार्टी करत होती करीना कपूर
अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरात हल्ला झाला. त्याच्या वांद्रे येथील घरात चोर घुसला होता, सैफने त्याला रोखण्याच्या प्रयत्न केला असता झटापट झाली आणि चोराने सैफवर चाकू हल्ला केला. पण ज्यावेळी सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खान ही घरी होती का असा सवाल उपस्थित होत आहे.
अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरात हल्ला झाला. त्याच्या वांद्रे येथील घरात चोर घुसला होता, सैफने त्याला रोखण्याच्या प्रयत्न केला असता झटापट झाली आणि चोराने सैफवर चाकू हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. पण ज्यावेळी सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान ही घरी होती का असा सवाल उपस्थित होत आहे. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक मोठी हिंट मिळाली आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे.त्याच्या वांद्रे येथील घरात चोर घुसला होता, सैफने त्याला रोखण्याच्या प्रयत्न केला असता झटापट झाली आणि चोराने सैफवर चाकूहल्ला केला. सैफला तताडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री 3.30 च्या सुमारास अभिनेत्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. सध्या त्याच्यावर लीलावतीमध्ये सर्जरी सुरू आहे. ज्यावेळी सैफवर हल्ला झाला तेव्हा तो त्याच्या वांद्रे येथील घरात झोपला होता. तेथए तो त्याची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खान आणि तैमूर-जहांगीर या दोन मुलांसह राहतो. मात्र ज्यावेली सैफवर हा हल्ला झाला तेव्हा करीना कपूर घरी होती का असा प्रश्न उपस्थित होती. ती तेव्हा पार्टी करत होती, असा अंदाज व्यक्त होत आहे. करीनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून हा अंदाज व्यक्त होत आहे.
काय आहे करीनाची पोस्ट ?
खरंतर, अभिनेत्री करीना कपूर खानने 8 तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये एका टेबलवर काही ड्रिंक्स ठेवलेली दिसत आहेत. हा फोटो प्रथम अभिनेत्री आणि करीनाची बहीण करिश्मा कपूरने शेअर केला होता, त्यानंतर करिनानेही तोच फोटो पुन्हा शेअर केला होता. मात्र, ती ज्यांच्यासोबत पार्टी करत होती, त्यामध्ये बहीण करीश्मा, तसेच अभिनेत्री सोनम कपूर आणि रेहा कपूर यांचा समावेश आहे. त्यांची गर्ल्स नाईट पार्टी कधी संपली, हल्ला झाला तेव्हा ती घरी, पती सैफसोबत होती की नाही, असे सवाल सध्या अनेक लोकांच्या मनात आहेत.
सैफवर झालेल्या हल्ल्याबाबत कुटुंबियांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सैफच्या घरी चोर नेमका कसा शिरला, त्याच्यावर हल्ला कसा झाला, त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते, यासंदर्भातील तपास मुंबई पोलीस करणार आहेत. यासाठी ते सैफच्या घरी पोहोचले आहेत.
डॉक्टरांनी काय सांगितलं ?
“सैफला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कण्याजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.