सैराट चित्रपटातील अभिनेत्याने शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो; लव्ह लाइफमुळे चर्चेत
सैराटमधला लंगड्या ही भूमिका करणारा तानाजी गळगुंडेनं त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करून सर्वांनाच आश्चर्यांचा धक्का दिला आहे. त्यामुळे आता आकाश आणि रिंकू नाही तर या दोघांची चर्चा जास्त होताना दिसत आहे.
सैराट हा चित्रपट आणि चित्रपटातील कलाकारांबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. सैराटने जवळपास त्यावेळच्या सर्वच चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले होते. सैराटमुळे चित्रपटातील कलाकार एका रात्रीत स्टार बनले होते. या ब्लॉकबस्टर सिनेमाने अनेक नव्या चेहऱ्यांना स्टार बनवलं.
चित्रपटातील परश्या, आर्ची, लंगड्या आणि सल्या या भूमिकांनी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. हे कलाकार आताही सतत चर्चेत असतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परश्या म्हणजे आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू या दोघांच्या जोडीबद्दल नेहमी प्रेक्षकांना उत्सुकता असते.
तानाजीने थेट गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट केला
एवढच नाही तर आकाश आणि रिंकू यांची जोडी खऱ्या आयुष्यातही असावी असंही मत त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केलं होतं. या दोघांच्या फोटोंनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळतं. पण प्रेक्षकांचं लक्ष या जोडीकडे लागलं असतानाच दुसरीकडे मात्र परश्याचा मित्रच बाजी मारून गेला. सैराटमध्ये परश्याचा मित्र दाखवलेला लंगड्या म्हणजे तानाजी गळगुंडे. तानाजीने थेट त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना थक्क केलं आहे.
तानाजी गळगुंडे त्याच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आला आहे. सैराट सिनेमातून लंगड्याच्या भूमिकेनं प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता म्हणजे तानाजी गळगुंडे. सैराटनंतरही त्याने अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. नुकताच त्याने गर्लफ्रेंडसोबतची स्टोरी रिपोस्ट केली आहे. त्यामुळे तानाजीची गर्लफ्रेंड पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटलंच पण ही मुलगी नक्की कोण? हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
तानाजीच्या गर्लफ्रेंडने नवीन वर्षाचं औचित्य साधत गर्लफ्रेंडसोबतचा खास फोटो शेअर केला. हा फोटो तानाजीच्या गर्लफ्रेंडने तिच्या स्टोरीवर पोस्ट केला होता. तसेत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “2025 वर्षात प्रवेश करते” आणि तानाजी गळगुंडेला टॅग केलं होतं. तानाजीनेही गर्लफ्रेंडसोबतची ही पोस्ट रिपोस्ट केली आहे. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. वेरुळ लेण्यांमध्ये फिरतानाचा त्यांचा सेल्फी आहे.
कोण आहे तानाजीची गर्लफ्रेंड?
तानाजी गळगुंडेच्या गर्लफ्रेंडचं नाव प्रतीक्षा शेट्टी. प्रतीक्षाचा स्वतःचा व्यवसाय आहे. ती होममेड साबण बनवते. याशिवाय ती कपड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते. तिच्या इंस्टा बायोवरून ती पुण्याची असल्याचं समजतंय.
View this post on Instagram
दरम्यान, तानाजी गळगुंडे एका जुन्या मुलाखतीत त्याची गर्लफ्रेंड असल्याचा उल्लेख केला होता, त्याने सांगितलं होतं की ते गेल्या चार-पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षासोबतच्या फोटोमुळे त्याची गर्लफ्रेंड कोण याचं उत्तर आता चाहत्यांना मिळालं आहे.