सल्या आणि लंगड्याचा ‘फ्री हिट दणका’, सैराटची जोडी पुन्हा एकत्र!

पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज आणि लंगड्या म्हणजे तानाजी आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सल्या आणि लंगड्याचा ‘फ्री हिट दणका’, सैराटची जोडी पुन्हा एकत्र!
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 7:31 PM

मुंबई : मैत्रीच्या अनेक गोष्टींपैकी एक जी नेहमीच आपल्या आठवणीत राहते ती मैत्री म्हणजे परश्या, सल्या आणि लंगड्याची ‘सैराट’ मैत्री. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज (Arbaz Shaikh) आणि लंगड्या म्हणजे तानाजी (Tanaji Galgunde) आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सैराट चित्रपटानंतर ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. (Sairat fame Tanaji galgunde and arbaz shaikh to come together once again for new film)

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कुठे दिसतील कोणत्या चित्रपटात कोणत्या माध्यमात दिसतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याला उत्तर म्हणजे सुनिल मगरे दिग्दर्शित ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट होय. मैत्रीची एक वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं होतं.

लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा जोमाने चित्रपटसृष्टी काम करू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘फ्री हिट दणका’ या नवीन चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाला सुनिल मगरे हे दिग्दर्शन तर संजय नवगिरे हे या चित्रपटाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन करणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन मॅनेजर राजू दौलत जगताप तर संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत.

(Sairat fame Tanaji galgunde and arbaz shaikh to come together once again for new film)

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.