मुंबई : साजन बेंद्रे (Sajan Bendre) हे आता महाराष्ट्राच्या मातीला माहित असलेलं नाव एकापेक्षा एक ठसकेबाज गाणी साजननं प्रेक्षकांसमोर आणली आहेत. साजनच्या प्रत्येक गाण्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. इतकेच नाहीतर साजनची हालकी पाकिस्तानात देखील वाजली, साजनचं बोल में हालगी बजाऊ क्या?…हे गाणं साजणच्या प्रसिध्द गाणांपैकी एक आहे. (Sajan Bendre’s song Bol Main Halgi Bajau Kya was watched by 11 lakh 39 people)
हे गाणे आॅक्टोबर 2019 मध्ये रिलीज झाले असून याला 11 लाख 39 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाचा ओढावर हे गाणं आहे. या अगोदरही आला बाई शंकरपाळ्या हे गाणं सुध्दा साजनच फेमस झालं होत याला यू ट्युबवर 4 लाख 64 हजारहून अधिक लोकांनी बघितले होते. यापूर्वीही साजनने आमदार झाल्यासारखं वाटतं, राडा राडा, शालू नाच नाच हे गाणे हिट झाले आहेत.
बोल में हालकी बजाऊ क्या?…या गाण्यामध्ये साजनने मराठी आणि हिंदीमध्ये दोन्ही भाषा वापरल्या आहेत. विधानसभा निवडणूकीवेळी सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला होता त्या पार्श्वभूमीवर या…या…या…बसा आमच्या बोकांडी हे गाणे देखील साजन बेंद्रे यांनी लिहिले आणि गायले होते. साजन बेंद्रे चालू घडामोडीवर गाणे तयार करतात आणि त्यांची गाणे सोशल मीडियावर धूमाकुळ देखील घालतात.
संबंधित बातम्या :
(Sajan Bendre’s song Bol Main Halgi Bajau Kya was watched by 11 lakh 39 people)