“मुलाला लाँच करायची इतकी घाई असेल तर नाच्याची भूमिका द्यावी”; महेश मांजरेकरवर टीकास्त्र

'वेडात मराठे वीर दौडले सात प्रदर्शित केल्यास पडदा फाडू'; सकल मराठा समाजाचा थिएटर्सना इशारा

मुलाला लाँच करायची इतकी घाई असेल तर नाच्याची भूमिका द्यावी; महेश मांजरेकरवर टीकास्त्र
सकल मराठा समाजाचा थिएटर्सना इशारा Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 4:18 PM

ठाणे- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाला विरोध वाढताना पाहायला मिळतोय. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहाचा पडदा फाडू, असा इशारा बदलापूरमधील सकल मराठा समाजाने चित्रपटगृहांना दिला आहे. तसंच हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित न करण्याची मागणी त्यांनी चित्रपटगृह चालकांकडे केली आहे.

या चित्रपटात चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. याच पार्श्वभूमीवर बदलापूरमधील सकल मराठा समाजाने शुक्रवारी चित्रपटगृह चालकांची भेट घेत या चित्रपटाला विरोध दर्शवला.

हे सुद्धा वाचा

हा चित्रपट प्रदर्शित केल्यास चित्रपटगृहाचा पडदा फाडू, असा इशारा यावेळी चित्रपटगृहांना देण्यात आला. त्यावर चित्रपटगृहचालकांनीही सहकार्याची भूमिका घेतली, अशी माहिती सकल मराठा समाजाकडून देण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

“महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा मराठा वीर मावळा म्हणून शोभत नाही. मांजरेकरांना त्याला लाँच करण्याची इतकीच घाई असेल, तर त्यांनी त्याला एखाद्या चित्रपटात नाच्याची भूमिका द्यावी,” अशीही टीका यावेळी मराठा समाजाकडून करण्यात आली.

महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाची घोषणा एका मोठ्या कार्यक्रमात झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार मराठीत पदार्पण करत आहे. अक्षय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....