तू तर बनावटी… सलीम खान यांनी सलमानला का फटकारले ?
सलमान खानचे वडील अनेकदा त्याला कामाबाबत सल्ले देत असतात. पण सलीम खान यांना सलमानच्या चित्रपटातील एक पात्र अजिबात आवडले नाही.
Salim Khan On Baghban : सुपरस्टार सलमान खान (salman khan) आपल्या कौटुंबिक चित्रपटांमध्ये अनेकदा प्रेम हे नाव वापरतो. आत्तापर्यंत सलमान अनेक चित्रपटांमध्ये (movies) या नावाने मोठ्या पडद्यावर दिसला आहे. मैने प्यार किया, हम आपके है कौन असो किंवा हम साथ साथ है असो. सलमानची प्रेम ही व्यक्तिरेखा बहुधा आदरणीय आणि दयाळू व्यक्तीची असते. एवढेच नव्हे तर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या ‘बागबान’ चित्रपटातही सलमान प्रेमच्या भूमिकेत दिसला होता.
‘बागबान’ हा असा चित्रपट आहे जो 90 च्या दशकातील जवळपास प्रत्येक व्यक्तीने पाहिला असेल. या चित्रपटात सलमानचा कॅमिओ होता. जिथे तो अमिताभ आणि हेमा यांच्या दत्तक मुलाच्या भूमिकेत दिसला होता आणि त्याचे नाव प्रेम होते. एकीकडे सलमानचे हे पात्र सर्वांना खूप आवडले. पण, सलमान खानचे खरे वडील सलीम खान यांना मात्र आपल्या मुलाचे चित्रपटातील हे काम अजिबातच आवडले नाही.
सलमानचे ‘प्रेम’ हे नाव सूरज बडजात्याने ठेवले होते. सलमान त्यांच्या प्रत्येक चित्रपटात प्रेमच्या भूमिकेत दिसत होता. रवी चोप्रा यांच्या 2003 मध्ये आलेल्या बागबान चित्रपटातही सलमानने प्रेमची भूमिका साकारत निरागसता दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच हे काम सलीम खान यांना फारसं आवडलं नाही. चित्रपटात तो “चांगल्या माणसासारखा” दिसण्याऐवजी तो “आंधळा” दिसत होता, असं सलीम खान म्हणाले होते. सूरज बडजात्यासोबतच्या जुन्या संभाषणात सलमानने सांगितले की, मला बागबानमध्येही समस्या आली होती. तो पिक्चर पाहून माझ्या वडिलांनी मला विचारलं होतं ‘तू आंधळा का दिसत आहेस?’ मी त्यांना विचारलं ‘आंधळा?’
सलमानला असं वाटत होतं की चित्रपटातून मोठ्या पडद्यावर तो जो चांगुलपणा आणि माणुसकी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्यक्षात तो तसा दिसत नाहीये. सलमानचे पात्र लोकांना आवडले होते, तरी त्यालाही ते फारसं भावलं नव्हतं. पण प्रत्यक्षात तो यशस्वी झाला नाही हे त्याला माहीत होते. सलमानला त्याच्या वडिलांचे वाक्य आठवले, त्यांच्या मते तो “चांगला माणूस दिसत नव्हता” परंतु त्याऐवजी तो खोटा, बनावटी दिसत होता.