मला मारहाण केली, ऐश्वर्याच्याही खांद्याचे हाड तोडले होते; सलमानवर एक्स-ग्रलफ्रेंडचे गंभीर आरोप
सोमी अलीने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सलमानच्या मारहाणीचा अनुभव आणि ऐश्वर्या रायला झालेल्या दुखापतीचा उल्लेख केला आहे. तिने लॉरेन्स बिश्नोईला सलमानपेक्षा चांगला मानले आहे. हे आरोप आणि सोमीची कथन बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणारे ठरले आहेत.
लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला येत असलेल्या धमक्यांमुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. अशातच आता सलमान खानच्या एक्स-ग्रलफ्रेंडने सलमानवर गंभीर आरोप केले आहेत. लॉरेन्स बिश्नोई हा सलमानपेक्षा चांगला आहे असे खळबळजनक वक्तव्य तिने केले आहे. IANSला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोमी अलीने सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तसेच तिने लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खानपेक्षा चांगला असल्याचं म्हटलं आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ही नेहमीच सलमान खानबाबत काहीना काही वक्तव्य करतच असते. आताही तिने असेच खळबळजनक वक्तव्य केले आहे.
तो नेहमी मारहाण करायचा, सलमानवर गंभीर आरोप
IANS शी खास संवाद साधताना सोमी अलीने सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतच्या तिच्या नात्याबद्दल आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सोमी अलीला विचारण्यात आले की सलमान खान त्याची मैत्रिणी संगीता बिजलानी आणि कतरिना कैफ यांच्याशी चांगले संबंध ठेवतो, परंतु तिच्यासोबत नाही. असं का? या प्रश्नावर उत्तर देताने तिने म्हटलं आहे की, “सलमान जसं माझ्यासोबत वागला तसं तो इतर कोणासोबतच वागला नाही. जितकं मला छळलं तितकं कतरिना आणि संगीतासोबत तो कधीच वाईट वागला नाही.’
सोमीने पुढे ऐश्वर्याबद्दलच्या सलमानच्या वागणूकीबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली, “त्याने ऐश्वर्यालाही खूप वाईट वागणूक दिली. मला वाटते की त्याने ऐश्वर्याच्या खांद्याचे हाडही तोडले होते, पण, त्याने कतरिनाचे काय केले याची मला खात्री नाही.” अशा पद्धतीचे गंभीर आरोप तिने केले आहेत.
सलमान खानपेक्षा लॉरेन्स बिश्नोई चांगला आहे…
सोमीने सलमानची तुलना थेट लॉरेन्स बिश्नोईशी करत म्हटलं की, “सलमान माझ्यासोबत जसा वागला आहे त्याच्यापेक्षा लॉरेन्स बिश्नोई कधीही चांगला आहे.’ एढच नाही तर, तिने हेही सांगितले की, सलमानने जेव्हा सोमीला मारहाण केली होती तेव्हा तिच्या घरातील नोकराने दरवाजा ठोठावत तिला मारहाण करू नका अशी विनंती केली होती.
माझी अवस्थापाहून तब्बू रडली होती…
सोमीने अजून किस्सा सांगितला आहे, एकदा तब्बूही तिची अवस्था बघून खूप रडली होती. तिने पुढे म्हटलं, ‘माझ्या पोटात खूप दुखत होतं तेव्हा मी बराच वेळ बेडवर पडून होते. माझी अवस्था पाहून तब्बू रडली पण सलमान मात्र तिला भेटायलासुद्धा आला नव्हता.’ तिने असंही सांगितलं की, तिची आई आणि जवळच्या मित्रांव्यतिरिक्त सलमानबद्दल जास्त कोणालाच माहित नाही. तसेच सोमी सलमान आणि तिच्या नात्याबद्दल एक पुस्तक लिहित आहे, ज्यामध्ये सर्वकाही खरं-खरं सांगितलं जाईल असही तिने म्हटलं आहे.
दरम्यान, सोमी अली ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये सक्रीय होती. ती आठ वर्षे सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर सलमान ऐश्वर्याला डेट करत असल्याचं समजल्यानंतर सोमी १९९९ मध्ये भारत देश सोडून गेल्याचे म्हटले जाते. सोमीने सलमानवर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता आहे.