Salman Khan – AR Rahman | ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या ए.आर. रेहमानवर भाईजानने केली होती ‘ ही’ कॉमेंट, मिळालं होतं सडेतोड उत्तर..

अभिनेता सलमा खानचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्याने ऑस्कर पुरस्कार विजेता संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमान याच्यावर मस्करीत टीका केली होती.

Salman Khan - AR Rahman | ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या ए.आर. रेहमानवर भाईजानने केली होती ' ही' कॉमेंट, मिळालं होतं सडेतोड उत्तर..
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 1:26 PM

Salman Khan Calls AR Rahman Average : अभिनेता सलमान खान (Salman Khan) बॉलीवुड मध्ये त्याच्या दबंग स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. मात्र कधी-कधी तो लोकांची मजेत फिरकी घेतो, त्यांच्यावर कमेंटही करतो. त्यामुळे अनेकांना वाईटही वाटत. पण सलमानला त्याची काही फारशी फिकीर नाही. सध्या त्याचा एक जुना व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे, ज्यामध्ये भाईजानने प्रख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमानवर (AR Rahman) टीका केली होती.

ए.आर. रेहमान हा तर ॲव्हरेज संगीतकार आहे , असं तो मजे-मजेत म्हणाला होता. मात्र त्यानंतर रहमानने त्याला जे सडेतोड उत्तर दिले ते ऐकून लोकांना हसूच आवरलं नाही.

नक्की काय झालं होतं ?

सलमानचा एका व्हिडीओ रेडिटवर पुन्हा चर्चेत आला आहे. खरंतर 2014 साली एक इव्हेंट झाला होता, ज्यामध्ये सलमान खान आणि ए.आर. रहमान हे दोघे एकाच स्टेवजर होते. तेव्हा बोलता-बोलता सलमानने मजेत म्हटले होते की रहमान हा एक ॲव्हरेज संगीतकार आहे. त्यानंतर सलमानने त्याला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत कधी काम करणार ?

रहमानच्या उत्तराने झाली बोलती बंद

सलमानच्या या प्रश्नावर रहमानने दिलेले उत्तर ऐकून अनेकांना हसू आवरलं नाही. रेहमान म्हणाला की ‘ मग तुला असे चित्रपट करावे लागतील जे मला आवडतील. तेव्हाच आपण सोबत काम करू शकू.’ त्याच्या या सडेतोड उत्तराने अनेकांची बोलतीच बंद झाली होती. तर काही लोक जोरजोरात हसू लागले. ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या रहमानबद्दल सलमानचे हे उद्गार अनेकांना आवडले नव्हते.

बॉलिवूडमध्ये काम करणं का बंद केलं ?

दरम्यान बॉलीवूडमधील गटबाजीमुळे काम करणे थांबवले आहे, असा धक्कादायक खुलासा 2020 मध्ये ए.आर. रहमानने केला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, ‘मी चांगले चित्रपट नाकारत नाही, पण मला वाटते की एक टोळी आहे, जी गैरसमजातून काही खोट्या अफवा पसरवत आहे. मुकेश छाबरा माझ्याकडे (दिल बेचारासाठी) आला तेव्हा मी त्याला दोन दिवसांत चार गाणी दिली. तेव्हा तो मला म्हणाला, सर, किती तरी लोकांनी मला सांगितलं की रहमान यांच्याकडे जाऊ नका, आणि त्याने मला असे अनेक किस्से सांगितले.

ते ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की मी हिंदीमध्ये एवढं कमी काम का करतोय, आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत. मी डार्क फिल्म्स करत आहे कारण एक संपूर्ण टोळी माझ्या विरोधात काम करत आहे. त्यांना हे कळत नाहीये की ते त्यांचे नुकसान करत आहेत, असे रहमान म्हणाला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.