सलमानचा मदतीचा ओघ सुरुच, 25 हजार बॅकस्टेज कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार जमा

लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या सिनेवर्कर्स/बॅकस्टेज कामगारांच्या मदतीला धावून आला आहे (Salman Khan helps back stage artist amid Lockdown).

सलमानचा मदतीचा ओघ सुरुच, 25 हजार बॅकस्टेज कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार जमा
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 9:09 PM

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान कोरोना संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या सिनेवर्कर्स/बॅकस्टेज कामगारांच्या मदतीला धावून आला आहे (Salman Khan helps back stage artist amid Lockdown). सलमानने चित्रपट इंडस्ट्रीतील 25 हजार सिनेवर्कर्स/बॅकस्टेज कामगारांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपये जमा केली आहे. तसेच ही परिस्थिती सुरळीत होऊपर्यंत पुढील 3 महिने सलमान या कामागारांना प्रति महिना 3 हजार रुपयांची मदत करणार आहे.

सलमान खानने आतापर्यंत कोरोना विरुद्धच्या लढाईत एकूण 22 कोटी 50 लाखांची मदत केली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचेही चित्रिकरण बंद पडलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. या क्षेत्रातील हजारो मजुरांचं हातावर पोट आहे. त्यामुळे अशा कामगारांना मदतीची नितांत गरज होती. हेच लक्षात घेऊन घेऊन सलमान खान पुढे सरसावला आहे. याआधीच सलमान खानने सिनेसृष्टीतील कामगारांसाठी दोन महिन्यात 10 कोटी 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ही मदत तो दोन टप्प्यांमध्ये करत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याची मदत त्याने आधीच केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात त्याने 5 कोटी 70 लाखांची मदत केली.

सलमान खान फिल्म प्रोडक्शनने फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडिया सिने इम्प्लॉयीजचे सचिव अशोक दुबे यांच्याजवळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मजुरांचे बँक अकाउंट नंबर मागितले होते. त्या माहितीच्या आधारेच सलमानने संबंधित कामगारांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित केले. या मदतीमुळे संबंधित कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या व्यतिरिक्त सलमान विविध संस्थासोबत मिळून गरजू लोकांना 3 महिने धान्य आणि जेवण पुरवण्यासाठी देखील पुढे आला आहे.

सलमानच्या घरातून पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु

कोरोना विषाणूमुळे ‘राधे’ सिनेमाची शूटिंग बंद आहे. मात्र, या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सलमानच्या घरुन सुरु होतं. लॉकडाऊनची घोषणा होताच, सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रभू देवा असून ते चेन्नई येथून सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम पाहात आहेत. ‘राधे’ सिनेमात सलमान आणि अभिनेत्री दिशा पटाणी सोबत काम करताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या  :

Lockdown : सलमानची दानत, शूट थांबलं तरीही ‘राधे’च्या क्रू मेंबर्सना पगार

स्पॉट बॉय ते फिल्म लाईन कामगार, 16 हजार कामगारांच्या खात्यात सलमानकडून थेट मदत जमा

सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवर, घोड्यासोबत विरंगुळा, मुंबईकरांना मोलाचा सल्ला

Salman Khan help to back stage artist amid Lockdown

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.