Salman Khan : सलमान खानला धमकी, “तुझा सिद्धू मुसेवाला करु”, सुरक्षारक्षकाला सापडलेल्या पत्राने खळबळ

हे लेटर सलीम खान यांच्या बॉडिगार्डला मिळालं आहे. सलमान खान वॉकला जातो आणि जिथे ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र आढळून आले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

Salman Khan : सलमान खानला धमकी, तुझा सिद्धू मुसेवाला करु, सुरक्षारक्षकाला सापडलेल्या पत्राने खळबळ
सलमान खानला धमकीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 7:51 PM

मुंबई : राज्यात नेत्यांना धमक्या येणे ही प्रकरणं अजूनही चर्चेत असाताना आता हे लोन बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. कारण आता बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाली (Death Threat) आहे. हे लेटर सलीम खान यांच्या बॉडिगार्डला मिळालं आहे. सलमान खान वॉकला जातो आणि जिथे ब्रेक घेतो त्या ठिकाणी हे पत्र आढळून आले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) खळबळ माजली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना भयंकर धमक्या देणारे एक निनावी पत्र रविवारी वांद्रे बँडस्टँडच्या विहाराजवळ सापडले. वांद्रे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, हे पत्र सलीम खानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एका जागेवर सापडले आहे. “सलीम खान सकाळच्या वेळी त्याच्या सुरक्षा कर्मचार्‍यांसह विहाराच्या ठिकाणी फिरायला जातो. तेथे एक जागा आहे जिथे तो सहसा विश्रांती घेतो. तिथे एका बेंचवर एक चिठ्ठी मागे ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तुझा सिद्धू मुसेवाला होईल

सलीम खान याच्या सुरक्षा कर्मचार्‍याला चिठ्ठी सापडली आणि त्यांनी ती त्यांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिटमध्ये सलमान आणि सलीम खान या दोघांनाही गंभीर धमक्या देण्यात आल्या होत्या. “मूसा वाला जैसा कर दूंगा”अशा आशयाचे हे पत्र होते. पोलीस बँडस्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि या चिट्टीमागे कोण हे शोधण्यासाठी स्थानिक लोकांची चौकशी करत आहेत.

सलमानला धमकी आल्याने खळबळ

मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली

या धमकीनंतर मुंबई पोलीसही अलर्ट मोडवर आले आहेत. त्यांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. तर पोलिसांनी तपासाची सुत्रेही वेगाने फिरवायला सुरूवात केली आहे. आता पोलीस चौकशीत हाती काय लागतंय? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी या धमकीने बॉलिवूडमध्ये टेन्शनचा माहोल आहे. या पत्रामागील सुत्रधार पकडण्याचे आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.

धमकीचं सत्र बॉलिवूडपर्यंत

सिद्धू मूस वाला प्रसिद्ध असलेला पंजाबी गायक याची 29 मे रोजी अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सरकारने याची सुरक्षा कमी केल्याच्या एक दिवसानंतर हा हल्ला झाला. या घटनेने देश हादरला होता. मात्र हेच धमकीचं सत्र आता बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्येही घबाराटीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या सुरक्षेत या धमकीनंतर मोठी वाढ करण्यात आली आहे. जेणेकरून कोणताही धोका होऊ नये.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.