Salman Khan : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर, अखेर सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Salman Khan : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर, अखेर सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 10:09 AM

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्यित हत्यांची योजना आखल्याप्रकरणी आणि सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या नेमबाजांना मदत केल्याप्रकरणी चंदिगड पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

चंदीगडच्या दादुमाजरा कॉलनीतून रविंदर सिंग आणि पंजाबच्या फाजिल्का येथून जावेद झिंझा यांना २५ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी मोहाली-रहिवासी करण कपूरला अटक करण्यात आली असे पंजाब येथील गुन्हे शाखेचे डीएसपी उदय पाल यांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाने सोमवारी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईल ॲप्सचा वापर

चंदीगडमध्ये बिश्नोई आणि लकी पटियाल टोळीचे सदस्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस 18 मे पासून या तिघांचा माग काढत होते. ते मोबाईल ॲप्सद्वारे संवाद साधून अटक टाळण्याचा प्रयत्न करत होते. अबोहर आणि भटिंडा येथील बिश्नोईचा बॅचमेट असलेल्या झिंझाने अवैध निधी व्यवस्थापित केला आणि चंदीगड आणि पंजाबमधील तरुणांना त्याच्या नेटवर्कमध्ये सामील होण्याचे आमिष दाखवले, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर पंजाब, राजस्थान आणि चंदीगडमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत. झिंजाचा जवळचा सहकारी रविंद्रने त्याला पैसे उकळण्यात मदत केल्याचा आरोप आहे. तर करण कपूर आपल्या घरातून बेकायदेशीर इमिग्रेशन व्यवसाय चालवतो आणि त्यांनी अनेकांना परदेशात पाठवले आहे.

असा झाला हल्ला

14 एप्रिल, रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटधील सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला होता. बाईकवरून आलेले दोन्ही शूटर्स गोळीबार करून तातडीने फरार झाले आणि मजल दरमजल करत ते गुजरातच्या भुज येथील एका मंदिरात जाऊन लपले होते. मुंबई पोलिस तसेच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत त्या शूटर्सना शोधून काढले होते. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्या आरोपींची नावे होती. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. या आरोपींपैकीच अनुज थापन याने आज पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याने चादरीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.