बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान खान सेलिब्रिटी लॉन्च करण्यासाठीही ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आणि कलाकार लाँच केले आहेत. ज्यात काहींचं नशीब चमकलं तर काहीजण अपयशी ठरले. चला अशा कलाकार आणि अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.
अभिनेत्री जरीन खानची सुरूवात सलमान खानने 'वीर' या चित्रपटापासून केली होती. राजकुमारीच्या भूमिकेपासून जरीन अनेक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. मात्र ती बीटाऊनमध्ये पाऊल ठेवू शकली नाही. अभिनेत्री शेवटी 'हम भी अकेले तुम भी अकेले' या चित्रपटात दिसली होती.
सलमान खानने स्नेहा उल्लालला आपल्या 'लकी: नो टाइम फॉर लव्ह' चित्रपटातून लाँच केलं, त्यानंतर सर्वजण तिला ऐश्वर्याची कॉपी म्हणू लागले होते. मात्र हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही आणि अभिनेत्रीलाही यश मिळू शकलं नाही.
डेझी शाह अनेक चित्रपटांमध्ये डान्स करताना दिसली. जरी तिने दक्षिण चित्रपटांमध्ये एक उत्कृष्ट भूमिका साकारल्या असल्या तरी 'जय हो' चित्रपटातून त्यानं सलमानबरोबर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत डेब्यू करून ओळख मिळवली. हा चित्रपट यश मिळवू शकला नाही आणि डेझी बॉलीवूडमध्ये नाव कमवू शकली नाही.
आयुष शर्मा सलमान खानचा मेहुणा आहे. अभिनेताने 'लवयात्री' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, मात्र प्रेक्षकांना त्याचा अभिनय इतका खास वाटला नाही. आता सलमान पुन्हा एकदा आयुषला ‘अंतिम’ या चित्रपटातून घेऊन येत आहे. प्रेक्षकांना आयुष शर्मा आवडतात की नाही हे आता बघावं लागेल.
'तेरे नाम' चित्रपटात भूमिका चावला सलमान खानसोबत दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. सलमानने स्वत: तिला लाँच केलं होतं. ही अभिनेत्री अजूनही फिल्मी दुनियेत सक्रिय आहे, मात्र ती टॉप अभिनेत्रींच्या यादीपासून खूप दूर आहे.