गोळीबाराला आठवडा उलटत नाही तोच सलमानला पुन्हा धमकी, लॉरेन्स बिश्नोईने थेट..

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गेल्या रविवारी झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली. गोळीबाराच्या या घटनेला अद्याप एक आठवडाही झालेला नसताना सलमान खान याला पुन्हा धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून ही धमकी देण्यात आली आहे.

गोळीबाराला आठवडा उलटत नाही तोच सलमानला पुन्हा धमकी, लॉरेन्स बिश्नोईने थेट..
सलमानला पुन्हा धमकीचा इशारा
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 3:39 PM

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गेल्या रविवारी झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास करत दोन आरोपींना अटक केली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी घेतली. गोळीबाराच्या या घटनेला अद्याप एक आठवडाही झालेला नसताना सलमान खान याला पुन्हा धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईकडून ही धमकी देण्यात आली आहे. खरंतर आज एका व्यक्तीने कॅब बुक करून सलमान खानच्या घरी पाठवली. ही कॅप लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने बुक करण्यात आली होती आणि ती गॅलेक्सी अपार्टमेंट येथे पाठवण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून रोहित त्यागी अस अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय झालं ?

सलमान खान राहतो त्या गॅलॅक्सी अपार्टमेटजवळ एक कॅब आली. त्या कॅबच्या ड्रायव्हरची तेथील सेक्युरिटी गार्डने चौकशी केली असता, कॅब ड्रायव्हरने ही कार लॉरेन्स बिश्नोईकडे नेण्यास सांगितले. त्याच्याच नावाने ही कॅब बूक करण्यात आल्याचेही त्याने नमूद केले. सलमान खानच्या घरापासून वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने हे बुकिंग करण्यात आले होते. मात्र या कॅबच्या बुकिंगचे नाव ऐकताच सलमान खानच्या बिल्डींगच्या सिक्युरिटी गार्डने तातडीने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी कॅब चालकाकडून माहिती घेतली. या प्रकरणाच्या तपासानंतर कॅब बुक करणाऱ्या व्यक्तीला गाझियाबाद येथून अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कार बुक करणाऱ्या आरोपीचे नाव रोहित त्यागी असे असून तो 20 वर्षांचा आहे. त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एअरपोर्टवर दिसला सलमान

घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान पहिल्यांदा एअरपोर्टवर दिसला. गोळीबाराच्या घटनेनंतर तो पहिल्यांदाच घराबाहेर पडला. सलमान खान विमानतळावर कडेकोट बंदोबस्तात दिसला.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.