तारें जमीन पर.. बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सलमान खान, शहनाज गिलसह सेलिब्रिटींची हजेरी

Baba Siddique Iftar Party : बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत बॉलिवूडचा भाईजान, अभिनेता सलमान खान उपस्थित होता. त्याच्याशिवाय मनोरंजन सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली .

तारें जमीन पर.. बाबा सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सलमान खान, शहनाज गिलसह सेलिब्रिटींची हजेरी
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 11:22 AM

मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी कॅमेऱ्याचे लक्ष या पार्टीत आलेल्या सलमान खानवर (Salman Khan) जास्त होते. अभिनेत्याचा काळा पठाणी लूक सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजानच्या महिन्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) आणि त्यांचा मुलगा जीशान सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. वृत्तानुसार, अभिनेता सलमान खान आणि बाबा सिद्दीकी हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काही वर्षांपूर्वी सलमान खान आणि बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान या दोघांचे झालेले भांडण सर्वांनाच माहीत आहे. त्या दोघांचा वादही बाबा सिद्दीकी यांनी सोडविल्याचे म्हटले जाते. म्हणून चांगला मित्र असलेल्या बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला (iftar party) सलमान आवर्जून हजेरी लावतो.

विरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सलमान खानसह सर्व स्टार्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. इफ्तार पार्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इफ्तार पार्टीत असा क्वचितच कोणी स्टार असेल जो दिसला नसेल. पण, यावेळेस शाहरुख खान या सेलिब्रेशनमधून गायबच राहिला.

या पार्टीतील सलमानच्या डॅशिंग लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काळ्या पठाणी सूटमध्ये भाईजानचा स्वॅग दिसत आहे. त्याचवेळेस त्याच्या आगामी चित्रपटातील नायिका पूजा हेगडे देखील खूपच सुंदर दिसत होती.

बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलही या पार्टीत उपस्थित होती. ती खूपच सुंदर दिसत होती.

या पार्टीसाठी सलमानची बहीण अर्पिता खानही पती आयुष शर्मासह आली होती.

दरवर्षीप्रमाणेच बाबा सिद्दीकी यांनी आपल्या मुलासोबत एक भव्य इफ्तार पार्टी आयोजित केली होती. रविवारी ताज लँड्स येथे हा सोहळा पार पडला. स्टार्सच्या एन्ट्रीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच या पार्टीसाठी सलमान खान, शहनाज गिल, पूजा हेगडे यांच्याव्यतिरिक्त राघव जुयाल, सुभाष घई, चंकी पांडे, रितेश देशमुख, जिनिलिया डिसूझा, एमसी स्टॅन, पलक तिवारी, इम्रान हाश्मी, प्रीती झिंटा, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, भारती सिंग, असे बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते. ग्लॅमर विश्वाला अलविदा केलेल्या सना खाननेही पती मुफ्ती अनससोबत या पार्टीला हजेरी लावली होती.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.