नवी दिल्ली : शुक्रवारी ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन ट्रेनचा विचित्र (train accident) अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात 288 प्रवासी मृत्यूमुखी पडले असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हृदय हेलावणाऱ्या या घटनेने सर्वजण नि:शब्द झाले आहेत. दु:खाच्या या काळात अनेक सेलिब्रिटींनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करता मृतांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे.
ओडिशा दुर्घटनेबद्दल सेलिब्रिटींनी व्यक्त दु:ख
ओडिशातील या भीषण अपघाताने सर्व देशवासियांचे डोळे पाणावले आहेत. काल रात्री झालेल्या या दुर्घटनेनंतर अपघातस्थळी हाहाकार माजला आहे. या अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांनी जीव गमावला असून अजूनही कित्येक जणांची मृत्यूशी लढाई सुरू आहे. संकटाच्या या काळात सर्व जण एकजूट होऊन पीडितांच्या कुटुंबियांसोबत उभे आहेत. सेलिब्रिटींनीही याबाबत सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले आहे.
अभिनेता सलमान खाननेही शोक व्यक्त केला आहे. ‘ अपघाताबद्दल समजल्यानंतर अतिशय दु:ख झाले. मृतांच्या कुटुंबियांना या धक्क्यातून बाहेर पडण्याचे बळ देवाने द्यावे . जखमींना लवकर बर वाटू दे अशी प्रार्थना.. ‘ असे ट्विट त्याने केले आहे.
Really saddened to hear abt the accident,May God rest the souls of the deceased in peace,Protect n give strength to the families n the injured from this unfortunate accident.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 3, 2023
तर अभिनेता सनी देओलनेही ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. ‘ओडिशातील बालासोर येथे झालेल्या वेदनादायक रेल्वे अपघाताबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. या रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.’
Deeply saddened to hear about the tragic train accident in Odisha’s Balasore.
My condolences to the families of those who died in this train accident and I pray to the Almighty for the speedy recovery of the injured.#TrainAccident— Sunny Deol (@iamsunnydeol) June 3, 2023
तर Jr NTR ने लिहिले की, ‘रेल्वे दुर्घटनेतील पीडित कुटुंबे आणि त्यांच्या प्रियजनांसाठी मी मनापासून प्रार्थना करतो. माझ्या प्रार्थना या घटनेत प्रभावित झालेल्या सर्व लोकांसोबत आहेत. त्यांना या कठीण प्रसंगाशी लढण्याची हिंमत मिळो, अशी मी प्रार्थना करतो.
Heartfelt condolences to the families and their loved ones affected by the tragic train accident. My thoughts are with each and every person affected by this devastating incident. May strength and support surround them during this difficult time.
— Jr NTR (@tarak9999) June 3, 2023
प्रसिद्ध गीतकार वरुण यांनीही ओडिशा रेल्वे अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे.
The train crash news is heartbreaking. The kind of tragedy that can numb an entire nation. Hope the relief and medical efforts save the injured and the trapped. Prayers for the departed and their families. #CoromandelExpress
— वरुण ?? (@varungrover) June 3, 2023
याशिवाय साऊथ सुपरस्टार चिरंजीवीनेही ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहनही चाहत्यांना केले आहे.
Utterly shocked at the tragic Coromandel express accident in Orissa and the huge loss of lives! My heart goes out to the bereaved families.
I understand there is an urgent demand for blood units to save lives. Appeal to all our fans and good samaritans in the nearby areas to…— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) June 3, 2023
अभिनेत्री व खासदार किरण खेर यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
जखमींसाठी रक्ताची सोय
दरम्यान, या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आळी आहे. जखमींना रक्त मिळावं म्हणून लोकांनी रक्तदान केलं आहे. बालासोरमध्ये रात्रभर लोक रक्तदान करत होते. आतापर्यंत 500 यूनिट रक्त डोनेट करण्यात आलं आहे. तसेच 900 यूनिट रक्त स्टॉकमध्ये आहे. त्यामुळे जखमींना त्याचा फायदा होणार आहे.
60 रुग्णवाहिका, बसेस आणि चार हॉस्पिटल
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेस दिले आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी आता आर्मी आणि एअरफोर्सची टीमही आली आहे. ओडिशा सरकारची स्पेशल रेस्क्यू टीमही बचाव कार्यात मदत करत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 60 रुग्णवाहिका आणि काही बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच चार रुग्णालयात या रुग्णांवर उपचार केले जात आहे. अपघातात दगावलेल्यांमध्ये सर्वाधिक लोक पश्चिम बंगालमधील आहेत.