सलमान खानच्या ‘सिकंदर’च्या तिकीटाची किंमत वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा जास्त, दर ऐकून व्हाल थक्क
सलमान खानचा आगामी सिनेमा 'सिकंदर'ची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या अडवान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पण सुरुवातीलाच या चित्रपटांच्या तिकिटांची किंमत बघून तुम्ही थक्क व्हाल. या चित्रपटाच्या तिकीटाच्या किंमतीत तुम्ही वंदे भारत ट्रेनने प्रवास करु शकता. तुम्ही विचार करत असाल की सलमान खानच्या या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत आहे तरी किती?
‘सिकंदर’ या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मल्टिप्लेक्समध्ये प्रीमियर तिकिटांचे दर २२०० रुपये आहेत. तर सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये रिक्लायनर सीट्ससाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत. तिकिटांच्या किंमती इतक्या असताना देखील चाहते तिकिट खरेदी करताना दिसत आहेत.
वाचा: 24व्या वर्षी लग्न, २७व्या वर्षी विधवा; कोण आहे स्मिता पाटीलची भाची?




‘सिकंदर’ सिनेमाच्या अडवान्स बुकिंगला गुरुवार पासून सुरुवात झाली. अवघ्या २४ तासांमध्ये जवळपास ४ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली. चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. अजून दोन दिवस शिल्लक असताना चित्रपटाने चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. सलमानच्या सिनेमांना अडवान्स बुकींगपेक्षा नेहमीच ऑन द स्पॉट बुकिंगचा फायदा होतो. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनानंतर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
मल्टिप्लेक्समध्ये ‘ब्लॉकबस्टर प्रायसिंग’चा वापर करून प्रीमियम तिकिटांचे दर वाढवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये ‘डायरेक्टर्स कट’ किंवा ‘लक्स’ तिकिटांचे दर हे २२०० रुपये आहेत. सामान्य मल्टिप्लेक्समध्ये तिकिटांचे दर हे मोठ्या शहरांमध्ये ८५० ते ९०० रुपये आहेत. तिकिटांची इतकी मोठी रक्कम देण्यासाठी सलमानचे चाहते तयार असतात.