Salman Khan Visit Shah Rukh Khan Home : शाहरुखचा पोरगा संकटात, सलमान खान थेट किंग खानच्या घरी, आधार मिळेल?

Aryan Khan Arrested: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एक दिवसाची कोठवडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे त्याची आजची रात्र ही पोलीस कोठडीत जाईल. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खाननं रात्री शाहरुखच्या घरी भेट दिली.

Salman Khan Visit Shah Rukh Khan Home : शाहरुखचा पोरगा संकटात, सलमान खान थेट किंग खानच्या घरी, आधार मिळेल?
SALMAN KHAN
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 11:40 PM

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एक दिवसाची कोठवडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे त्याची आजची रात्र ही पोलीस कोठडीत जाईल. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खाननं रात्री शाहरुखच्या घरी भेट दिली. शाहरुख खानचा मन्नत (Mannat) नावाचा बंगला मुंबईतल्या बँडस्टँड भागात आहे. त्याच घरी भाईजाननं भेट दिलीय.

आर्यन खानला कोठडी सुनावल्यानंतर सलमान मन्नतवर   

विशेष म्हणजे शाहरुख आणि सलमान यांच्यात फारसं जमून नसल्याच्या बातम्या अनेक वेळेस आलेल्या आहेत. पण भाईजानच्या आजच्या कृतीनं दोन्ही खान एकत्र आल्याचं दिसतंय. आर्यन खान हा शाहरुखचा मोठा मुलगा असून सुहाना आणि अबराम अशी इतर दोन मुलं त्यांना आहेत. त्यातला आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्याला दुपारनंतर आज कोर्टासमोर हजर केलं गेलं. नंतर त्याला एक दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.

सलमान खान  शाहरुखच्या ‘मन्नत’वर दाखल 

सलमान खान रात्री दहाच्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ ह्या बंगल्यावर दाखल झाला. अर्थातच सकाळपासूनच शाहरुखच्या घराबाहेर माध्यमकर्मींनी गर्दी केलीय. त्यामुळे शाहरुखच्या घरातून कोण बाहेर पडतंय, कोण आत जातंय यावर कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष आहे. सलमान खान रात्री आला त्यावेळेस तो येत असल्याची कुणकुण पत्रकारांना लागलेलीच होती. त्यामुळे तो येताच कॅमेऱ्यांनी एकच गराडा घातला.

ब्लॅक अँड व्हाईट रेंज रोव्हरमध्ये आला 

सलमान हा एका ब्लॅक अँड व्हाईट रेंज रोव्हरमध्ये मन्नतवर दाखल झाला. त्याच्या डोक्यावर टोपी होती आणि जसाही तो मन्नतच्या गेटवर आला तशी कॅमेऱ्यामन्सनी मोठी गर्दी केली. ह्या गर्दीला बाजूला सरकण्याचा इशाराही सलमान खानने केला. पण कुठलीही प्रतिक्रिया देण्यास त्यानं नकार दिला. गाडीची काचही खाली न करता तो थेट मन्नतमध्ये घुसला.

आर्यनला एका दिवसाची कोठडी, नेमकं प्रकरण काय आहे ?

दिल्लीच्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तीन दिवसांच्या क्रूझ टूरचं आयोजन केलं होतं. हे क्रूझ शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघणार होतं. विशेष म्हणजे क्रूझमध्ये तीन दिवसांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हे क्रूझ तीन दिवसांनी पुन्हा मुंबईत येणार होतं. याच क्रूझमध्ये आर्यन खान आणि त्याचे मित्र गेले होते. या क्रूझच्या या पार्टीची इन्स्टाग्रामवरही जाहिरात करण्यात आली होती. तसेच क्रूझने प्रवास करण्यासाठी आणि तिथल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकी 80 हजार रुपये तिकीट होतं, अशी माहिती समोर आली आहे. याच क्रूझमध्ये आयोजित पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं जाणार असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यानंतर कारवाई करत एनसीबीने आर्यन खानला अटक केली. सध्या त्याला एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

इतर बातम्या :

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

मोठी बातमी : शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

मुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक?

(salman khan visit shahrukh khan home after aryan khan arrest by ncb in drugs and rave party case)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.