Salman Khan | ऐश्वर्या नव्हे, सलमानला ‘या’ अभिनेत्रीशी लग्न करायचं होतं, पण बाप…
58 वर्षांच्या सलमानचं नाव आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलंय. पण त्याला एका अभिनेत्रीशी खरोखर लग्न करण्याची इच्छा होती, तिच्यासाठी तो तिच्या घरापर्यंत गेला होता , हे तुम्हाला माहीत आहे का ?
Salman Khan Birthday | बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचं नाव हीच त्याची खरी ओळख आहे. अनेक दशकांपासून मोठा पडदा गाजवणारा, कोट्यवधी चाहते असणाऱ्या सलमानने आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींसह काम केले आहे. पण त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा पर्सनल आयुष्यचं जास्त चर्चेत असतं. 58 वर्षांच्या सलमानचं नाव आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलंय. पण त्याला एका अभिनेत्रीशी खरोखर लग्न करण्याची इच्छा होती, तिच्यासाठी तो तिच्या घरापर्यंत गेला होता , हे तुम्हाला माहीत आहे का ?
वयाच्या 58 व्या वर्षांपर्यंत सिंग असलेला सलमान खानंच नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं, पण तो एका अभिनेत्रीच्या खरोखर प्रेमात पडला आणि लग्नाची मागणी घालण्यासाठी तिच्या घरापर्यंत पोहोचला. ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय नव्हे तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला होती. सलमान तिच्या प्रेमात पडला होता. हे खरं आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान सलमाननेच हा खुलासा केला होता.
बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री जुही चावला मला खूप आवडते आणि तिच्यासोबत लग्न करायचं होतं, अस सलमाननेच कबूल केल होतं. एवढचं नव्हे तर लग्नाचा प्रस्ताव घेऊन तो तिच्या घरीदेखील गेला होता. मात्र तेव्हा जूही चावलाच्या वडिलांनी त्याचा प्रस्ताव फेटाळत लग्नाला पूर्णपणे नकार दिला होता. यानंतरही सलमान खानच्या आयुष्यात अनेक सुंदरी आल्या पण आजही सलमान खान बॅचलर आहे. तर अभिनेत्री जुही चावला 1995 मध्ये जय मेहतासोबत लग्नबंधनात अडकली. भाईजानचे हे गुपित फार कमी लोकांना माहिती आहे, पण जेव्हा सलमान खानने एका मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
चित्रपटात कधीच दिसली नाही सलमान- जुहीची जोडी
सुपरस्टार सलमान खानने अभिनेत्री भाग्यश्रीसोबत ‘मैने प्या किया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याने करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे, काजोल, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, कतरिना कैफ, करीना कपूर, जॅकलीन फर्नांडिस, अनुष्का शर्मा, जरीन खान, सुष्मिता सेन, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत काम केले. पण सलमान खान आणि जूही चावलाची जोडी मोठ्या पडद्यावर कधीच दिसली नाही.
सलमानने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. टायगर 3 हा त्याचा चित्रपट नुकताच रिलीज झाला. सध्या तो बिग बॉस 17 मुळे चर्चेत आहे.