शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे,’स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर शिवरायांना मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या कलाकारांनीही सेटवर आगळी शिवजयंती साजरी केली.

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे,'स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या सेटवर शिवरायांना मानवंदना
taramati
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 2:59 PM

मुंबई : शिवरायांस आठवावे, जिवित्व तृणवत मानावे समर्थांच्या या ओळीतून छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांची महती स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (Swaraj saudamini Tararani)  मालिकेच्या कलाकारांनीही सेटवर आगळी शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी केली. या वेळी सेटवर दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी लहानग्यांनी सादर केली. लहानग्यांच्या समोर शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर उभा करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला.

नक्की काय झालं सेटवर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांची शौर्यगाधा सर्वांसमोर मांडण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या सेटवर दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके करण्यात आली. या खास वेळी सर्वांचे लक्ष प्रात्यक्षिके करणाऱ्या लहानग्यांनी वेधून घेतले.

येणाऱ्या प्रत्येक पिढीला हा इतिहास सांगण्याचे दायित्व आपल्याकडे आहेच. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून तो अधिक जोरकसपणे पोहचवणे महत्त्वाचे असल्याचे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेचे निर्माते घनश्यामराव यांनी यावेळी सांगितले.

ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा

सोनी मराठी वाहिनीवरील’ ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक केंढे या मालिकेचे दिग्दर्शन करीत आहेत. या मालिकेत स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या भूमिकेत स्वरदा थिगळे असून छत्रपती राजाराम राजेंची दमदार भूमिका अभिनेता ‘संग्राम समेळ’ साकाराली आहे. यतीन कार्येकर यांनी औरंगजेबाची भूमिका केली आहे.

‘जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे ताराराणींचे जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे स्वराज्याबद्दलचे शब्द आणि थेट युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्याला मालिकेमध्ये दिसत आहे. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका ताराराणीच्या जीवनावर भाष्य करणारी मालिका आहे.

संबंधित बातम्या

शिवजयंतीनिमित्त ‘सेर सिवराज है’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, गायक दिव्य कुमार याच्या आवाजात शिवरायांना नमन

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यामी गौतमचा ‘थर्स डे मूड’, पाहा टॉप 5 फोटो

Vaishali Bhaisane | माझ्या हत्येचा कट रचलाय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेच्या फेसबुक पोस्टने खळबळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.