बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोसोबत रोमान्स करायचाय, समांथाचे बिनधास्त बोल!

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात.

बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट हिरोसोबत रोमान्स करायचाय, समांथाचे बिनधास्त बोल!
समंथा अक्किनेनी
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:32 PM

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात. अभिनेत्री समांथा लवकरच मनोज बाजपेयी अभिनीत ‘द फॅमिली मॅन’ या सीरीजच्या दुसऱ्या भागातून हिंदी मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या या आगामी वेब सीरीजमुळे ती प्रसिद्धी झोतातही आली होती (Samantha Akkineni wants to do a romantic film with ranbir kapoor).

नुकताच समांथाच्या या सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून, सगळीकडे तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. ही वेब सीरीज 4 जून रोजी Amazon प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्रीने बॉलिवूडच्या एका हिरोला आपला आवडता अभिनेता म्हणून वर्णन केले आहे.

‘या’ चॉकलेट हिरोसोबत रोमान्स करायचाय!

‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरीजमध्ये या अभिनेत्रीने तमिळ लिबरेशन फ्रंट एलटीटीई सदस्याची भूमिका साकारली आहे. अशा परिस्थितीत सध्या समांथा आपल्या वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार नुकत्याच झालेल्या प्रमोशन दरम्यान तिने खुलासा केला आहे की, बॉलिवूड चित्रपटांकडून आपल्याला अनेक ऑफर आल्या आहेत, परंतु भाषेच्या मुद्द्यांमुळे तिने या चित्रपटांना नकार दिला आहे.

इतकेच नव्हे तर अभिनेत्रीने उघडपणे सांगितले आहे की, जर तिला बॉलिवूडचा चित्रपट मिळाला तर तिला पडद्यावर कोणत्या बॉलिवूड कलाकारासोबत रोमान्स करायला आवडेल?, असा प्रश्न विचारण्यात आला. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार अभिनेत्रीने या प्रश्नाचे उत्तर देताना हँडसम हंक अभिनेता रणबीर कपूरचे (ranbir kapoor) नाव घेतले आहे. म्हणजेच समांथाला रणबीर कपूरला रोमान्स करायचा आहे (Samantha Akkineni wants to do a romantic film with ranbir kapoor).

त्याच वेळी समांथाचा पती आणि दक्षिणचा सुपरस्टार नागा चैतन्य याने देखील तिच्या आगामी वेब सीरीजबद्दल अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. परंतु, या सीरीजवर तमिळ जनता संतप्त झाली आहे. रिलीजच्या आधी या सीरीजवर बरेच वादंग सुरू झाले आहेत.

कंगनाचे केले कौतुक

काही काळापूर्वी, कंगनाचा आगामी चित्रपट ‘थलायवी’चे पहिले गाणे ‘चली चली’ रिलीज झाले होते. या गाण्यानंतर अभिनेत्री समांथाने कंगनाचे कौतुक केले. तिने ट्वीट केले, ‘अम्माची अस्मित कृपा आणि तिच्या पडद्याआड असलेल्या आश्चर्यकारक गोष्टींविषयी सर्वांना माहिती आहे. सिनेमातून मुख्यमंत्री होईपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासाचे साक्षीदार रहा. यानंतर, कंगनाने देखील अभिनेत्रीची स्तुती केली आहे आणि ट्विट केले- “या शब्दांबद्दल माझ्या प्रिय समांथाचे खूप आभार… आपण महिला सबलीकरणाचे प्रतीक आहात, आम्हाला एकमेकांना सक्षम बनवणे आवश्यक आहे आणि तेच खरी स्त्रीत्व आहे, धन्यवाद!’

(Samantha Akkineni wants to do a romantic film with ranbir kapoor)

हेही वाचा :

Photo : ‘तेरी खुशी मेरी ख्वाहिश’, हीना खानची आईसाठी भावनिक पोस्ट

अशी आहे सुष्मिता सेनच्या लेकीची ‘लव्ह लाईफ’, ‘बॉयफ्रेंड कोण’? चाहत्याच्या प्रश्नावर उत्तरे देताना म्हणते…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.