Samantha-Naga Divorce : समांथा – नागा चैतन्यच्या घटस्फोटामागे ‘या’व्यक्तीचा हात, मंत्र्याने केला दावा, समांथा, नागार्जुन भडकले

तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. मात्र त्यामुळे समांथा भडकली असून तिचे माजी सासरे नागार्जुन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Samantha-Naga Divorce : समांथा - नागा चैतन्यच्या घटस्फोटामागे 'या'व्यक्तीचा हात, मंत्र्याने केला दावा,  समांथा, नागार्जुन भडकले
समांथा - नागा चैतन्य
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 10:28 AM

अभिनेत्री समांथा रुथ प्रभु आणि तिचा माजी पती नागा चैतन्य हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचं कारण म्हणजे तेलंगणधील एक मंत्र्याने त्यांच्या घटस्फोटाबाबत एक विधान केलं असून त्यामुळे आता वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटासाठी बीआरएस नेते केटी रामाराव हे जबाबदार असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेत्या आणि तेलंगणाच्या पर्यावरण तथा वनमंत्री कोंडा सुरेखा यांनी केलं आहे. केटीआर यांच्यावर अनेक आरोप सुरेखा यांनी केले आहेत. या घटस्फोटामागे केटीआर यांचाच हात असल्याचा दावा सुरेखा यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होताना दिसत असून अभिनेत्री समांथाने याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तर तिचे माजी सासरे, अभिनेता नागार्जुन यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

कोंडा सुरेखा यांनी समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तेलगु सुपरस्टार नागार्जुन चांगलाच भडकला आहे. त्यांनी सोशल मीडियावरही याबद्दल एक पोस्ट केली असून सुरेखा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत, त्यांनी विधान मागे घ्यावं अशी मागणी केली आहे.

नागा चैतन्य- समांथा घटस्फोट

अभिनेत्री वक्तव्यावर समंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य यांनी 2017 साली थाटामाटात लग्न केलं पण 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नानंतर चार वर्षांच्या आतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनीही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून नागा चैतन्य याने नुकताच अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्याशी साखरपुडा केला. हे जोडपं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दोघंही त्यांच्या आयुष्यात पुढे जात अस्ताना आता काँग्रेसच्या नेत्या कोंडा सुरेखा यांच्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

“केटीआर यांनी अनेक जोडप्यांना विभक्त केलं आहे. त्यामध्ये समांथा व नागा चैतन्य या जोडप्याचाही समावेश आहे. त्यांना महिला आणि नायिकांचं शोषण करण्याची सवय आहे. केटीआर यांनी अनेकांना चित्रपटसृष्टी सोडण्यास भाग पाडलं आहे”,असं विधान कोंडा सुरेखा यांनी केलं होतं. तसेच त्यांनी केटीआर यांच्यावर अनेक आरोपही केले.

समांथा झाली नाराज

मात्र कोंडा सुरेखा यांच्या या वक्तव्यामुळे अभिनेत्री समांथा ही भडकली असून तिने नाराजी व्यक्त करत कडक शब्दात ताशेरे ओढले. तसेच तिचे माजी सासरे अभिनेता नागार्जुन याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. इन्स्टा स्टोरीवर पोस्ट करून समांथाने रोखठोक उत्तर दिलं आहे. ‘ माझा घटस्फोट ही वैयक्तिक बाब आहे, त्याला राजकारणापासून दूर ठेवणे उत्तम.’

नागर्जुननेही व्यक्त केली नाराजी

तर या घटनेवर समांथाचे माजी सासरे, नागा चैतन्य याचे वडील, अभिनेता नागार्जुन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कोंडा सुरेखा यांचे वक्तव्य व्हायरल झाल्यावर नागार्जुन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘ कोंडा सुरेखा यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो.  राजकीय टिका-टिप्पणी करण्यासाठी चित्रपट कलाकारांच्या खासगी आयुष्याचा वापर करू नये. इतरांचा, तसेच चित्रपट कलाकारांच्या खासगी आयुष्याचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही (सुरेखा) केलेल्या टिप्पण्या व आरोप चुकीचे आहेत. तुम्ही वापरलेले शब्द मागे घ्या’ अशी पोस्ट नागार्जुन यांनी लिहीली आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.