आई होणार आहे Sana Khan ? पतीसोबत खास फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

| Updated on: Feb 06, 2023 | 3:10 PM

आई होणार आहे Sana Khan ? धर्माचा मार्ग अवलंबत मनोरंजन विश्वाला ‘अलविदा’ म्हटलेल्या सना खान हिचा पतीसोबत खास फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण

आई होणार आहे Sana Khan ? पतीसोबत खास फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...
आई होणार आहे Sana Khan ? पतीसोबत खास फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...
Follow us on

Sana Khan and Mufti Anas : झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी अभिनेत्री सना खान कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी, सना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. धर्माचा मार्ग अवलंबत मनोरंजन विश्वाला ‘अलविदा’ म्हटलेल्या सना खान हिची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री पती मुफ्ती अनस सैय्यद (Mufti Anas) याच्यासोबत दिसत आहे. पतीसोबत फोटो पोस्ट करत सना हिने खास कॅप्शन लिहिलं आहे. सनाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

सना खान पती मुफ्ती अनस सैय्यद याच्यासोबत उमराहसाठी गेली आहे. सनाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्री पतीसोबत सोफ्यावर बसली आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री विमानात बसली आहे. पतीसोबत फोटो पोस्ट करत सना म्हणते, ‘उमराहा काही कारणामुळे प्रचंड खास आहे, आणि ते कारण देखील तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

सनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सना लवकरच आई होणार असा अंदाज वर्तवत चाहते अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत. सनाच्या पोस्टवर एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘अल्लाह तुम्हाला एक आरोग्यसंपन्न बाळ देईल…’, दुसरा युजर म्हणाला, ‘मला असं वाटतं तुम्ही दोघं लवकरच आई – बाबा होणार…’, एवढंच नाही तर, अन्य एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘तू आई होणार आहेत? म्हणून उमराह तुझ्यासाठी खास आहे…’ सध्या सनाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सनाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘बिग बॉस 9 ‘ शोमध्ये दमदार स्पर्धकांपैकी एक होती. त्यानंतर सनाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. शिवाय सना हिने मोठ्या पड्यावर देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सना तिच्या लव्हलाईफमुळे देखील तुफान चर्चेत आली होती. पण २०२० नंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे बदल झाले. अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सना खानने मुफ्ती अनस (Mufti Anas) याच्यासोबत लग्न केलं. मुफ्ती अनस गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. जेव्हा अभिनेत्रीने हा मोठा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता अभिनेत्री पतीसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.