मुंबई : कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा (Aditya Alva) याला अटक करण्यात आली आहे. सँडल वुड ड्रग्स केसप्रकरणी बंगळूरुच्या केंद्रीय गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सप्टेंबर 2020 पासून आदित्य अल्वा फरार होता. या कारणामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार रद्द करण्यात आली होती. (Sandalwood Drugs Case Aditya alva Arrested)
मंगळवारी आदित्य अल्वाचे मेडिकल चेकअप करण्यात आले. त्यानंतर कोर्टात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. यावेळी चौकशीदरम्यान आदित्य अल्वाने निर्दोष असल्याचा दावा केला. मी फक्त पार्टी आयोजित केली होती. पण मी ड्रग्ज घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही, असे आदित्यने चौकशीदरम्यान सांगितले होते. आदित्यच्या आतापर्यंतच्या चौकशीत ड्रग्ससंबंधित कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात केंद्रीय गुन्हे शाखेने अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याच्या मुंबईतील घरावर छापा टाकला होता. आदित्य विवेकच्या घरात लपला असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे शाखेला अर्थात सीसीबीला मिळाली होती. त्यानंतर सीसीबीने विवेक ओबेरॉय याच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांच्या घराचीही झडती घेतली होती.
नेमकं प्रकरणं काय?
आदित्य अल्वाच्या बंगळूरच्या हाऊस ऑफ लाईफ या राहत्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आला, असा आरोप आहे. आदित्य अल्वा याचा ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपीशी जवळचा परिचय आहे. कोट्टनपेट पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या ‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात आदित्य अल्वा यांचे नावही समोर आले आहे. तसेच आदित्य हा आणखी बऱ्याच पार्ट्यांमध्ये सहभागी झाला होता.
ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर
‘सँडल वुड ड्रग्ज’ प्रकरणात नाव समोर आल्यानंतर आदित्य सतत लपण्याची जागा बदलत आहे. तसेच, त्याने आपला फोनदेखील बंद केला आहे. ‘सँडल वुड ड्रग्ज’ घोटाळ्याची माहिती निर्माता-दिग्दर्शक इंद्रजित लंकेश यांनी सीसीबीला दिली होती. कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्येही ड्रग्सचे व्यवहार सुरू असल्याचे त्याने सीसीबीला सांगितले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान इंद्रजित लंकेश यांनी 15 जणांची नावे घेतली होती. त्यापैकी अभिनेत्री रागिनी द्विवेदीला ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय कन्नड अभिनेत्री संजना गलराणीलाही पोलिसांनी अटक केली होती. (Sandalwood Drugs Case Aditya alva Arrested)
संबंधित बातम्या :
Vivek Oberoi | फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विवेक ओबेरॉयच्या घरावर क्राईम ब्रँचचा छापा!