SSR Death | रुग्णवाहिका चालकाला चार वेळा फोन, निर्माता संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर
सुशांतच्या मृत्यूनंतर रुग्णवाहिकेचा चालक अक्षय बंडगर याच्याशी संदीप सिंहचे दोन दिवसात चार वेळा बोलणे झाले.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतचा मित्र आणि चित्रपट निर्माता संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर आहे. संदीप सिंहचे कॉल रेकॉर्ड ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागले आहेत. सुशांतचे पार्थिव रुग्णालयात नेणाऱ्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरशी संदीपने दोन दिवस फोनवर चर्चा केल्याचे समोर आले आहे. (Sandeep Singh called Ambulance Driver Akshay Bandgar 4 times)
रुग्णवाहिकेचा चालक अक्षय बंडगर याच्याशी संदीप सिंहचे दोन दिवसात चार वेळा बोलणे झाले. 14 जून आणि 16 जूनला दोघांमध्ये फोनवर बोलणे झाल्याचे कॉल रेकॉर्डमधून समोर आले. 14 जूनला तीन वेळा, तर 16 जूनला एकदा दोघांची बातचीत झाली.
दोघांची कधी किती वेळ चर्चा?
14 जून – 48 सेकंद (6:40) 14 जून -51 सेकंद (7:57) 14 जून -104 सेकंद (9:59) 16 जून -24 सेकंद (9:59)
कोण आहे संदीप सिंह?
संदीप सिंह हा चित्रपट निर्माता आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा तो जवळचा मित्र असल्याचा दावा केला जात आहे. संदीपने सरबजीत, भूमी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.
हेही वाचा : विषप्रयोग केल्याने सुशांतचे शवविच्छेदन उशिरा, सुब्रमण्यम स्वामींचा गंभीर आरोप
दरम्यान, संदीप सिंहच्या भूमिकेवर सीबीआयचा संशय वाढला होता. दहा महिन्यांपासून संदीप सुशांतच्या संपर्कात नव्हता. ईडीकडे संदीप आणि सुशांत यांचा कॉल डेटा असल्याने त्यातून ही माहिती समोर आली.
सुशांतचा स्टाफ त्याला ओळखतही नव्हता. घरचेही ओळखत नव्हते, मग अचानक संदीप सुशांतच्या मृत्यूपश्चात पुढे-पुढे करत असल्याने त्याच्यावर सीबीआयचा संशय बळावला. पब्लिसिटी स्टंटसाठी सुशांतच्या मृत्यूचं भांडवल केल्याचाही दावा केला जात आहे.
‘वंदे भारतम’ हे पोस्टर संदीपने 20 जूनला इंस्टाग्रामवर शेयर केले होते. दोघेही एकत्र चित्रपट निर्मिती करणार होतो, असे त्याने सांगितले होते. मात्र दहा महिन्यांपासून संदीप सुशांतच्या संपर्कात नसताना हे कसे शक्य आहे, असा सवाल निर्माण झाला.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 25 ऑगस्टhttps://t.co/hh8k6mR2Yh
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2020
(Sandeep Singh called Ambulance Driver Akshay Bandgar 4 times)