Shocking : सुशांतच्या आत्महत्येनंतर आरोपीच्या पिंजऱ्यात, संदीप सिंहची अंकिता लोखंडेच्या पार्टीला हजेरी

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं शनिवारी (19 डिसेंबर) वाढदिवस साजरा केला.(Sandeep Singh's attendance at Ankita Lokhande's party)

Shocking : सुशांतच्या आत्महत्येनंतर आरोपीच्या पिंजऱ्यात, संदीप सिंहची अंकिता लोखंडेच्या पार्टीला हजेरी
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 3:38 PM

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेनं शनिवारी (19 डिसेंबर) वाढदिवस साजरा केला. या पार्टीला अंकिताचे मित्र-मैत्रिणी आणि काही सेलेब्ससुद्धा पोहोचले. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडिओमध्ये सुशांतसिंह राजपूतचा मित्र संदीप सिंहसुद्धा स्पॉट झाला. व्हिडीओमध्ये संदीपनं निळ्या रंगाचा कुर्ता आणि पॅन्ट परिधान केला आहे आणि तो विक्की जैनसोबत उभा असल्याचं दिसत आहे. सोबतच अंकिता रश्मीसोबत डान्स करत आहे.

View this post on Instagram

A post shared by @ssrfighters

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात संदीप सिंहचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं. सुशांतच्या आत्महत्येनंतर संदीप सुशांतच्या घरी पोहोचला आणि बर्‍याच मुलाखतींमध्ये त्यानं स्वत: ला सुशांतचा खास मित्र म्हणून सांगितलं होतं. मात्र सुशांतच्या कुटुंबीयांनी ते संदीपला ओळखत नसल्याचं सांगितलं आणि सोबतच सुशांतनं कधीही कुटुंबीयांना संदीपबद्दल सांगितलं नसल्याचंही ते म्हणाले.

सुशांत आणि अंकिताबद्दल हे बोलला संदीप संदीपनं सोशल मीडियावर सुशांत आणि अंकिताबद्दल एक पोस्ट लिहिली होती, ‘प्रिय अंकिता, आपण त्याला थांबवू शकलो नाही. जरी तुम्ही दोघं विभक्त झालात, तरीही तु फक्त त्याच्या आनंदासाठी आणि यशासाठी प्रार्थना करत होती, तु सुशांतवर खरं प्रेम केलंस. तु अजूनही त्याचं नाव तुझ्या घराच्या नेमप्लेटमधून काढलेलं नाही. मला आठवतं जेव्हा लोखंडवालामध्ये आपण तिघं एकत्र कुटुंबासारखे राहायचो….मला अजूनही विश्वास आहे की तुम्ही दोघं एकमेकांसाठी होते. मात्र आता मी सुशांतला परत कसं आणू. ‘

अंकिता – विक्कीचा डान्स व्हिडीओ व्हायरल अंकिताच्या पार्टीतील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यात अंकिता डान्स करता-करता विक्की जवळ जाते आणि त्याची गळाभेट घेते. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....