… म्हणून मनोज जरांगे मराठा आरक्षण चळवळीचे नायक झाले, ‘संघर्ष योद्धा’ आज प्रदर्शित होणार, माहीत नसलेले जरांगे समजणार

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'संघर्षयोद्धा' हा सिनेमा आज प्रदर्शित होणार असून सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेले जरांगे या चित्रपटाच्या माध्यमातून समजणार आहेत.

... म्हणून मनोज जरांगे मराठा आरक्षण चळवळीचे नायक झाले, 'संघर्ष योद्धा' आज प्रदर्शित होणार, माहीत नसलेले जरांगे समजणार
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 11:36 AM

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सतत लढा देणारे मनोज जरांगे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्वत्र त्यांची ओळख पसरली आहे. याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘संघर्षयोद्धा’ हा सिनेमा आज म्हणजेच 14 जूनला प्रदर्शित होणार असून आज दुपारी 12.15 वाजल्यापासून राज्यातील सर्व थिएटर्समध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ असे चित्रपटाचे नाव असून त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

जरांगे यांच्या जीवन व आजवरच्या संघर्षवर हा चित्रपट असून चित्रपट हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून चित्रपट पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याही भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. या सिनेमात छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी यांनी केली आहे. तर दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका साकारली आहे. शिवाजी दोलताडे यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे पाटील , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते, मात्र आता त्यांनी उपोषण स्थगित केले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज त्यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट प्रदर्शित होत असून, जरांगे हे स्वतः हा चित्रपट पाहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटात माझा जीव नाही, आरक्षणात जीव आहे. चित्रपट तयार करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे ते म्हणाले होते.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.