एखादी गोष्ट तुमच्या मनातील शांतता नष्ट करत असेल तर.. सानिया मिर्झाची ‘ती’ पोस्ट चर्चेत, घटस्फोटाच्या चर्चा..
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. नुकतीच सानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक अशी पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. ती पोस्ट पाहून सानियाच्या आयुष्यात सगळ काही आलबेल नसल्याचा अंदाज अनेक जण वर्तवू लागले.
मुंबई : 16 जानेवारी 2024 | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिचं वैयक्तिक आयुष्य बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या संसारात ठिणगी पडल्याच्या, आणि ते दोघे वेगळे होत असल्याच्या अफवानांही अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं.सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेल्या सानियाने त्याच दरम्यान असं काही केलं ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सानियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती शोएब मलिकचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही संसारात मिठाचा खडा पडला असून काहीच ठीक नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. तर शोएब मलिकनेही त्याच्या इन्स्टाग्राम बायोमधून सानिया मिर्झाशी विवाहित असल्याची माहिती काढून टाकली आहे. याआधी त्याच्या बायोमध्ये ‘सुपरवुमनचा पती’ असा उल्लेख होता. मात्र आता त्यानेही ते डिलीट केलं आहे.
घटस्फोटाच्या अफवांदरम्यान क्रिप्टीक पोस्ट
या चर्चा अजूनही थंडावत नाहीत तोच सानियाच्या एका जुन्या पोस्टने सर्वांचे पुन्हा लक्ष वेधून घेतलं. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वीच एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली होती. “जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयातील शांतता नष्ट करते, तेव्हा ती जाऊ द्या.” या पोस्टने बर्याच लोकांचे लक्ष वेधून घेतलं. ती पोस्ट पाहून सानियाच्या आयुष्यात सगळ काही आलबेल नसल्याचा अंदाज अनेक जण वर्तवू लागले. मात्र घटस्फोटाच्या वृत्तावर सानिया किंवा शोएब या दोघांपैकी कोणीच अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
View this post on Instagram
सानिया आणि शोएबला एक मुलगा आहे. आणि टेनिस स्टार सानिया, अनेकदा तिच्या लाडक्या मुलासह स्वतःचे फोटो पोस्ट करते. तो तिची सर्वात मोठी ताकद आहे, हेच ती त्यातून दर्शवण्याचा प्रय्तन करते. इझानचा जन्म 2018 मध्ये झाला होता आणि तो त्याचे आई-वडील दोघांचाही अतिशय लाडका आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
आयशा उमरसोबतच्या शोएब मलिकच्या अफेअरमुळे बिघडले संबंध ?
पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरचं शोएब मलिकशी नाव जोडलं गेलं होतं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत अशी चर्चा होती. त्यामुळेच सानिया आणि शोएब यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. तथापि, आयशाने या अफवा फेटाळून लावल्या ज्यात दावा केला होता की ती विवाहित पुरुषाशी कधीही संबंध ठेवणार नाही.त्यावर आयेशानेही प्रतिक्रिया दिली होती. , “मी कधीच कोणत्याही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही.” असं तिने स्पष्ट केलं होतं. आयेशा आणि शोएबने एक फोटोशूट केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.