Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे, हे तर ऐश्वर्या-अभिषेक बच्चन बनले; सानियाच्या त्या पोस्टमुळे लोकांना आठवलं बच्चन कुटुंब

Sania Mirza And Shoaib Malik Divorce : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सस्पेंस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचा घटस्फोट झाला आहे आणि दोघेही बराच काळ वेगळे राहत आहेत. त्यातच सानियाने इन्स्टाग्रामवरून शोएबचे सर्व फोटो हटवल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आले.

अरे, हे तर ऐश्वर्या-अभिषेक बच्चन बनले;  सानियाच्या त्या पोस्टमुळे लोकांना आठवलं बच्चन कुटुंब
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 7:40 AM

मुंबई | 19 जानेवारी 2024 : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचं वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेच. तिच्या पर्सनल लाईफमध्ये खळबल माजली आहे. सानिया आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. सानियाने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शोएबचे सर्व फोटो हटवले. तसेच ती सध्या ज्या काही पोस्ट्स शेअर करत आहे, त्यामुळे अप्रत्यक्षरित्या या बातम्यांवर शिकामोर्तबच करत आहे का, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. वेगळं होण्याच्या बातम्यावर सानिया किंवा शोएब या दोघांपैकी कोणीच अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलचं गूढ अजूनच वाढत चाललं आहे.

तच आता सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न आणि घटस्फोटाबद्दल, एकंदर आयु्ष्यबद्दल पोस्ट शेअर केली आहे.’ लग्न कठीण असतं, घटस्फोट कठीण असतो’ अशा आशयाची एक पोस्ट तिने शेअर केली . त्यामुळे लोकांच्या भुवया तर उंचाल्याच, पण काहींना तर या पोस्टमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचीही आठवण झाली. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या नात्यातही रफ पॅच आला असून त्यांचं लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे एकीकडे सानिया- शोएबची चर्चा सुरू असतानाच लोकं अभिषेक-ऐश्वर्याबद्दलही बोलत आहेत.

सानिया आणि शोएबने एकमेकांचे फोटो हटवले

हे सुद्धा वाचा

सानिया मिर्झा आणि शोएब यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दोघांचं लग्न 2010 साली झालं, त्यावेळी या लग्नामुळे बरेच वाद झाले होते. बराच काळ ते एकत्र खुश होते मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वेगळं होण्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातच आता सानिया आणि शोएब दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो हटवले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांचा बायोही चेंज केला.

यापूर्वी शोएब मलिकच्या इन्स्टा प्रोफाइलमध्ये ‘Husband of a Superwoman’ असे लिहिले होते, पण आता ते आता बदलले आहे. तर सानियाच्या बायोमध्ये तिचं नाव आधी सानिया मिर्झा मलिक होतं ते आता फक्त सानिया मिर्झा असं झालं आहे.

लग्न कठीण असतं, घटस्फोट कठीण

त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान, सानिया मिर्झाच्या एका पोस्टने तिच्या चाहत्यांना आणखीनच त्रास दिला आहे. खरंतर, सानियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न, घटस्फोट याच्याशी निगडीत पोस्ट शेअर केली. ‘ लग्न कठीण असतं, घटस्फोट कठीण असतो.. जाडेपणा कठीण असतो, फिट राहण कठीण असतं.. कर्ज घेण कठीण असतं, हात राखून पैसे खर्च करण कठीण असतं. संवाद राखणं कठीण असतं, न बोलणं कठीण असतं. आयुष्य कधीच सोप नसतं, ते नेहमीच कठीण असतं. पण आपण आपल्या कठीण गोष्टी स्वत: निवडतो. त्याची समजूतदारपणे निवड केली पाहिजे, ‘ अशी पोस्ट सानियाने लिहीली.

या पोस्टमध्ये तिने लिहीलं आहे लग्न कठीण असतं, घटस्फोटही सोपा नसतो, तो कठीण असतो. तिच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे, असं सानिया सतत नमूद करत आली आहे. याच कारणामुळे तिच्या चाहत्यांना असं वाटतंय की तिने स्पष्टपणे काही न बोलता, इशाऱ्यांमध्ये घटस्फोटाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. ती आणि शोएब वेगळे झाले आहेत, असा अंदाज नेटकरी व्यक्त करत आहेत.

मात्र तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावर लोकांनी तिला अनेक प्रश्न विचारले, पण तिने अद्याप मौन सोडलेलं नाही. मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, त्या दोघांचा फार पूर्वीच घटस्फोट झाला आहे, परंतु त्यांच्या प्रोफेशनल कमिटमेंटमुळे दोघेही या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.

लोकांना का आठवले अभिषेक-ऐश्वर्या ?

दरम्यान काही लोकांनी सानिया-शोएबचं नाते अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्याशी जोडले आहे, ज्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या देखील चर्चेत आहेत. बॉलिवूडचे हे पॉवर कपल आता वेगळे झाल्याची चर्चा सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून होत आहे. ऐश्वर्या आणि तिची नणंड, अभिषेक बच्चनची बहीण श्वेता बच्चन यांचं नातं ठईर नाही, त्यामुळेच ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबियांचं घर सोडून वेगळी रहात आहे. ती आणि मुलगी आराध्या या वेगळ्या राहतात, ऐश्वर्या-अभिषेक लवकरच वेगळे होणार, मालमत्तेवरून त्यांचं भांडण सुरू आहे, अशा एका ना अनेक चर्चा, अफवा काही काळापासून सुरू आहेत. पण बच्चन कुटुंबीय किंवा अभिषेक-ऐश्वर्या यांच्यापैकी कोणीच यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही, ना त्या बातम्यांचं खंडन केलं.

मात्र काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या, आराध्या, अभिषेक आणि अमिताभ बच्चन हे प्रो कबड्डी लीगच्या मॅचवेळी एकत्र उपस्थित होते. त्यामुळे ते एकत्र आहेत, सगळं आलबेल आहे अशा चर्चाही सुरू झाल्या.

सानिया-शोएबने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही

त्याचप्रमाणे सानिया मिर्झा-शोएबनेही त्यांच्या नात्यावर मौन पाळले आहे आणि त्यामुळे त्यांचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. लोक सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत की ‘ हे तर अभिषेक-ऐश्वर्या बनले आहेत!’ सायना आणि शोएबचे लग्न 2010 मध्ये झाले होते. दोघांनाही एक मुलगा आहे. पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा उमरचं शोएब मलिकशी नाव जोडलं गेलं होतं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत अशी चर्चा होती. त्यामुळेच सानिया आणि शोएब यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. पण आयशाने या अफवा फेटाळून लावल्या. “मी कधीच कोणत्याही विवाहित किंवा कमिटेड पुरुषाकडे आकर्षित होणार नाही.” असं तिने स्पष्ट केलं होतं. आयेशा आणि शोएबने एक फोटोशूट केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत...
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत....
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?.
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा.
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन.
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट.
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, 'आता जे होईल ते...'.
पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे
पुरातत्व विभागाने औरंगजेबाच्या कबरीजवळ ठोकले पत्रे.
बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण...
बँकांची काम असतील तर आजच करून घ्या, पुढील चार दिवस बँका बंद; कारण....
आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट
आधी ऑफर, आता शेकहँड... विधानसभेत एकनाथ शिंदे-नाना पटोलेंची भेट.
सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सतीश भोसलेच्या कोठडीत वाढ; आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.