Sanjay Dutt : त्यांनी आदर राखायचा ना… मान्यताशी लग्नामुळे बहिणींशी वाजल्यावर संजय दत्त काय म्हणाला होता ?

अभिनेता संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अंमली पदार्थांचा वापर, तुरुंगवास, तीन लग्नं ते बहिणींसोबतच्या नात्यातला दुरावा... संजय दत्तचे आयुष्य नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. मान्यतासोबतच्या लग्नानंतर त्याचे बहिणींसोबतचे नाते बिघडल्याची चर्चा होती.

Sanjay Dutt : त्यांनी आदर राखायचा ना... मान्यताशी लग्नामुळे बहिणींशी वाजल्यावर संजय दत्त काय म्हणाला होता ?
संजय दत्त
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 3:39 PM

अभिनेता संजय दत्त आणि वाद हे काही नवे नाही , सुरुवातीपासूनच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने कारकिर्दीत अनेक चित्रपटांत काम केलं, काही सुपरहिट र काही फ्लॉपही झाले. मात्र त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या आई-वडिलांनी आणि दोन्ही बहिणींनीही खूप साथ दिली आहे. विशेषतः त्याची धाकटी बहीण प्रिया दत्त नेहमी त्याच्यासोबत उभ्या राहिल्या. संजय दत्ता जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा त्याची बहीण असलेल्या प्रिया दत्त नेहमी त्याला भेटायला जायच्या. मात्र संजय दत्तचं तिसरं लग्न झाल्यावर त्यांच्या नात्यात दुरावा आला. मान्यता सोबत झालेल्या लग्नात संजय दत्तच्या दोन्ही बहिणींपैकी कोणीच आलं नाही की लग्नाच्या वाढदिवसालाही त्यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या नाहीत. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा संजय दत्तला त्याच्या बहिणींसोबतच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो थोडा रागावलेला दिसत होता.

खरंतर काही वर्षांपूर्वी तो ‘आप की अदालत’ कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी त्याला प्रश्न विचारण्यात आला की तुझे लग्न झालं पण तू तुझ्या बहिणींना बोलावलं नाही? त्यावर संजय दत्तने सांगितले की, दोन्ही बहिणींना लग्नाचे आमंत्रण दिले होते पण त्या आल्या नाहीत, ही त्यांची इच्छा होती. संजय दत्त आणि मान्यता यांच्या लग्नामुळे त्याच्या बहिणी खूश नसल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं होतं.

बहिणींबद्दल काय म्हणाला संजय दत्त ?

तुझ्या लग्नाचा वाढदिवस साजरा केलास तेव्हाही तुझ्या दोन्ही बहिणई आल्या नाहीत, असा प्रश्नही संजय दत्तला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ती त्यांची मर्जी होती, मी तर त्यांना बोलावलं होतं. एक मोठा भाऊ आपल्या बहिणींसाठी जे करतो, ते मी सगळं केलं. त्यांनी ( लग्न/ वाढदिवसाला) यावं अशी माझी इच्छा होती. त्याचवेळी संजयने आपण तुरूंगात असताना, बहिणींनी जो संघर्ष केला, त्या आठवणींबद्दलही सांगितलं. भावा-बहिणीचं नातं असं असतं की मी माझ्या बहिणींसाठी एखादी गोष्ट केली तर ती हक्काने करतो, पण त्याची पब्लिसिटी करायाल मला आवडणार नाही, असे त्याने नमूद केलं.

बहिणी आपल्या लग्नाला न आल्याबद्दलही तो बोलला, त्या माझ्या छोट्या बहिणी आहेत तर त्यांनी थोडा आदर राखायला हवा होता. पण ( न येणं) ही त्यांची चॉईस आहे. त्या नाही आल्या. प्रत्येक कुटुंबात भांडणं तर होतंच राहतात , वादही होतात. प्रिया (दत्त) सर्वात छोटी आहे. तिच्याकडून काही चूक झाली असेल तर मोठ्या भावाच्या नात्याने मी तिला माफ केलं. तिने मला एक जादूची झप्पी द्यावी ( मिठी मारावी) अशीच माझी इच्छा आहे, असं संजय दत्त म्हणाला होता.

पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली
पिपाणी वाजणारंच...निवडणूक आयोगाने शरद पवारांची 'ती' मागणी फेटाळली.
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'
निवडणुकीच्या तारखा घोषित होताच जरांगे संतापले,'फडणवीसांनी खुन्नस दिली'.
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा
विधानसभा निवडणुकीत मतदान जास्त व्हावं म्हणून आयोगाकडून 'या' सुविधा.
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान
Assembly Election बिगुल वाजलं, विधानसभा निवडणुकांचे ‘या’ तारखेला मतदान.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 23 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून बेड्या.
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा
उदय सामंत-जरांगेंची मध्यरात्री भेट, 2 तास चर्चा; भेटीनंतर थेट इशारा.
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत
अयोध्येत कारसेवा करणारी शिवसेनेची महिला नेता मनिषा कायंदे विधानपरिषदेत.
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ
महिलांचा बुलंद आवाज विधान परिषदेत,चित्रा वाघ यांनी घेतली आमदारकीची शपथ.
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ
राज्यातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी, 'या' 7 जणांनी घेतली शपथ.
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं
भाजप आमदारांचीही तिकीटं कापणार? दिल्लीत कोअर कमिटीच्या बैठकीत काय झालं.