Sanjay Dutt | कर्करोगावर यशस्वी मात, संजू बाबाकडून चाहत्यांना आनंदाची बातमी!

सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिती त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत.

Sanjay Dutt | कर्करोगावर यशस्वी मात, संजू बाबाकडून चाहत्यांना आनंदाची बातमी!
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 4:11 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) यांने फुप्फुसाच्या कर्करोगावर (Lung Cancer) यशस्वी मात केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिती त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत. ‘केवळ माझे कुटुंबिय, डॉक्टर आणि तुमच्या सर्वांच्या आशिर्वादामुळे ही शक्य झाले आहे’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, आता संजय दत्तने स्वतः हे आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. (Sanjay Dutt Successfully beat Lung Cancer share good news with fans)

‘गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय कठीण होते. पण, म्हणतात ना की देव सगळ्यांना मजबूत करण्यासाठी अशा खडतर प्रसंगांचा सामना करायला लावतो. आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीर करत आहे की, मी या आजारावर पूर्णपणे मात केली आहे. माझ्या कुटुंबासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वाद आणि प्रार्थनांनशिवाय ही शक्य झाले नसते. या कठीण काळात मला साथ देणारे माझे कुटुंब, मित्र परिवार आणि सगळ्या चाहत्यांचा मी आभारी आहे.

डॉ. शेवंती आणि त्यांच्या टीमचे विशेष आभार. कोकिलाबेन रुग्णालयातील सगळे डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफने माझी खूप काळजी घेतली. सगळ्यांचे मनःपूर्वक आभार’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.( Sanjay Dutt Successfully beat Lung Cancer share good news with fans)

याआधी संजय दत्तच्या एका निकटवर्तीयाने तो पूर्णपणे बरा झाल्याची माहिती माध्यमांना दिली होती. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. गेल्या आठवड्यात त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे त्यांनी म्हटले होते.

लवकरच चित्रीकरणावर परतणार

कर्करोगावर मात केलेला संजय दत्त लवकरच ‘केजीएफ 2’ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. चित्रीकरणाआधी संजय दत्त हेअरस्टाईलसाठी सेलिब्रिटी हेअरस्टाईलिस्ट आलीम हकीम याच्याकडे गेला होता. आलीम हकीमने संजय दत्तसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात संजूबाबाने सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. (Sanjay Dutt Successfully beat Lung Cancer share good news with fans)

कोरोनाच्या संशयामुळे लीलावती रुग्णालयात होता दाखल

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला 8 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे नंतर त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात संजयला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. रुग्णालयात दाखल असतानाही संजय दत्तने ट्वीट करत त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली होती.

“मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोव्हिड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद”, असे ट्वीट संजय दत्तने केले होते. यानंतर तपासणी दरम्यान त्याला फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते.

संजय दत्तचा ‘पानिपत’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता तो ‘सडक 2’, ‘शमशेरा’, ‘भुज’, ‘केजीएफ’, ‘पृथ्वीराज आणि तोरबाज’ अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनामुळे काही चित्रपटांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला होता.

(Sanjay Dutt Successfully beat Lung Cancer share good news with fans)

संबंधित बातम्या :

संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता

परमेश्वर परीक्षा घेतोय, पण आम्ही जिंकू, संजय दत्तची पत्नी मान्यताची भावनिक प्रतिक्रिया

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.