Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लिहितो संजय लीला भन्साळी; आणि त्याच्या प्रत्येक सिनेमातील स्त्री असतेच अधिक गडद…

परिंदा सिनेमाचे काम पूर्ण झालं आणि चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या टीमची नावं ज्यावेळी मागवण्यात आली, त्यावेळी त्यानं आपलं नाव लिहिलं संजय लीला भन्साळी. आणि त्या दिवसांपासून ज्या ज्या वेळी भव्यदिव्य सिनेमा आला की, नाव झळकत राहतं ते म्हणजे संजय लीला भन्साळी...

आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव लिहितो संजय लीला भन्साळी; आणि त्याच्या प्रत्येक सिनेमातील स्त्री असतेच अधिक गडद...
sanjay leela bhansali
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 7:13 AM

मुंबईः बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख आणि छाप आहे. मग चित्रपटाच्या (Indian Cinema) नावापासून ते अगदी चित्रपटातील वेगवेगळ्या संदर्भाचा घेतलेला मागोवा असेल संजय लीला भन्साळी हा दिग्दर्शक नेहमीच चर्चेत राहणारा दिग्दर्शक (Director)आहे. त्यामुळेच त्याची डोळे दीपवून टाकणारा दिग्दर्शक अशी एक प्रतिमा निर्माण झाली आहे. संजय लिला भन्साळीच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे आयाम प्रस्थापित केले आहेत ते याच कारणामुळे. आज संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस त्याबद्दल…

संजय लिला भन्साळीच्या प्रत्येक चित्रपटाचा आशय आणि विषय इतरांपेक्षा वेगळा असतो. म्हणूनच त्याचा सिनेमा एकदा का बॉक्सऑफिसवर आला की, तो इतरांपेक्षा वेगळेच परिमाण सिद्ध करतो. त्याची इतरांपेक्षा एक वेगळी ओळख आहे ती, म्हणजे तो आपल्या नावापुढे आपल्या आईचं नाव लावतो. त्याला अनेकांना खासगीत त्याच्या नावाचा खिस्सा विचारलेला आहे, त्यावर अनेक जण असेच सांगतात की, तो आपल्या आईविषयी इतकं काही भरभरुन बोलतो की, बोलता बोलता तो ऐकणाऱ्याला त्याची आई समोर आहे असच वाटतं. या प्रेमापोटीत तो आपल्या वडिलांच्या नावाऐवजी आईचं नाव लावतो. या कारणाबरोबरच संजय या नावापुढे आपल्या आईचं नाव का जोडतो याचंही एक खास कारण सांगितलं जातं.

ऋण फिटत नाही म्हणून संजय लीला भन्साळी

आपल्या आईच्या प्रेमापोटी तो आईच नाव लावत असला तरी त्याच्या जवळच्या मित्रांना या लिला नावाचा खिस्सा सांगताना तो एका जाहीर मुलाखतीत भावुक होताना अनेकांनी पाहिलं आहे, तो त्या मुलाखतीत सांगतो की, माझे वडिल निर्माते होते, पण निर्माते म्हणून त्यांना त्या क्षेत्रात यश मिळाले नाही. त्याचे ते दुःख घेऊन कित्येक दिवस ढकलत राहिले आणि त्यांना दारुचे व्यसन लागले. त्या निर्माते होण्याच्या प्रवासातील त्या वाईट काळात वडिल दारुच्या इतके व्यसन करु लागले की, त्यांना कुटुंबाचे भान राहिले नाही, आणि त्यांनी घराची जबाबदारी घेणे सोडून दिले. त्यानंतर त्यांच्या आईची कसोटी लागली, ती घर चालवण्याची. वडिलांना घराची जबाबदारी घेणे सोडून दिल्यावर त्यांच्या आईने म्हणजेच लीला भन्साळी यांनी घर चालवण्याची जबाबदारी घेतली. मग मुलांसाठी आणि घरासाठी त्यांनी गुजराती रंगमंचावर काम करायला सुरुवात केली. गुजराती थिएटरमधून त्यांनी नृत्याचे कार्यक्रम केले आणि घर सांभाळले. त्या काळात त्यांच्या आईने फक्त नृत्याच्या कार्यक्रमावर घर चालणार नाही म्हणून त्यांनी कपडे शिवण्याचेही काम केले. घरातील आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसली तरी त्यांनी मुलांना शिक्षणाच्या बाबतील मागे ठेवले नाही, लीला भन्साळी यांनी कधी नृत्य तर कधी कपडे शिवण्याचा आधार घेत त्यांनी मुलांना उच्च शिक्षित केले आणि याच गोष्टींचा संजय भन्साळी यांच्यावर कायम प्रभाव राहिला आहे.

नाव विचारताच म्हणाले…

संजय लीला भन्साळी यांनी आपल्या आईचा संघर्ष जवळून बघितला होताच. त्या परिस्थितीत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे पुण्यातील एफटीआय या चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेतला. एफटीआय झाल्यानंतर त्यांनी विधू विनोद चोप्रा यांना सहायक दिग्दर्शक म्हणून राहिले. त्यावेळी विदू विनोद चोप्रा परिंदा नावाचा चित्रपट बनवत होते, आणि त्याच चित्रपटनिर्मितीच्या वेळी विदू विनोद चोप्राच्या प्रतिभेला त्यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी त्याला आपला सहायक दिग्दर्शक म्हणून निवडले होते. परिंदा सिनेमाचे काम पूर्ण झाले आणि चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या टीमची नावं ज्यावेळी मागवण्यात आली, त्यावेळी त्यानं आपलं नाव लिहिलं संजय लीला भन्साळी.

कधी कुणी त्याला मुलाखतीत संजय लीला भन्साळी नावाची गोष्ट विचारली की, तो सगळं काही सांगत नाही पण म्हणतो तेवढीच माझी उतराई आहे म्हणतो…

भन्साळींच्या चित्रपटातील स्त्री

भन्साळींचे चित्रपट पाहताना तुम्हाला लक्षात येईल की, त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील नायिका ही गडद आणि तितक्याच गंभीरपणे तिला अधोरेखित केलेले असते. चित्रपटसृष्टीतील कितीही मोठी अभिनेत्री असली तरी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात मात्र ती त्या भूमिकेसाठीच ओळखली जाते हेच त्यांच्या चित्रपटाची खासियत आहे.

भन्साळी यांचा पहिलावहिला चित्रपट होता खामोशीः द म्यूजिकल. खामोशी चित्रपटात नाना पाटेकर, सलमान खान यांच्याबरोबरच अगदी खास आकर्षण होते ते मनीषा कोईराला हिचे. असेच आकर्षण राहिले ते हम दिल दे चुके सनम मधील ऐश्वर्याचे. कारण यामध्येही सलमान आणि अजय देवगण हे हिरो म्हणून असले तरी त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा लक्षात राहते ती ऐश्वर्याचीच. तर देवदासमध्येही जेवढं आपण देवदासाला महत्व देतो तेवढच आपण पारो आणि चंद्रमुखीसाठीही दुःखी होतो.

भूमिकांचं अस्तित्व

ज्या चित्रपटात अमिताभ बच्चन असेल त्या चित्रपटात अन्य कोणा कलाकाराला पडद्यावर आपलं अस्तित्व निर्माण करणे कठीण असते, पण या गोष्टीला ब्लॅक हा चित्रपट मात्र अपवाद ठरला आहे. ब्लॅक चित्रपटात नटसम्राट अमिताभ असूनही त्यामध्ये राणी मुखर्जीची भूमिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. गुजारिश चित्रपटात भले ऋतिक हा मुख्य भूमिकेत असेलही पण ऐश्वर्या रायला ज्या पद्धतीने संजय लीला भन्साळीनी सादर केली आहे त्यावरुन वाटतं की, ऐश्वर्याशिवाय या चित्रपट पूर्ण होऊच शकत नाही.

‘ती’ आहे केंद्रस्थानी

गोलियों की रासलीला रामलीला आणि बाजीराव मस्तानी या सिनेमातील एक गोष्ट अधोरेखित करता येते ती ही की दीपिका पदुकोन हिची भूमिका रणवीरच्या भूमिकेपेक्षा तसूभरही कमी नव्हती. रामलीला मध्ये दोन्हीही भूमिका या एक समांतर पातळीवर जाताना दिसून येतात, तर बाजीराव मस्तानीमध्ये काही ठिकाणी दीपिका आणि प्रियंकासमोर बाजीरावच्या भूमिकेतील रणवीरला तुम्ही सहज नजरेआड करु शकता. अगदी तसच त्यांच्या पद्मावत चित्रपटातील रणवीर, शाहिद कपूर आणि दीपिकाबद्दलही आहे.

रसिकांच्या नजरेत भरणारी भव्यता

संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट म्हणजे भव्य आणि दिव्य असे. भन्साळी यांनी जी भव्यता हम दिल दे चुके सनमपासून सुरु ठेवली आहे ते अगदी त्यांच्या पद्मावत आणि गंगुबाई काठियावाडीपर्यंत सुरुच आहे. संजय लीला भन्साळींच्या चित्रपटातील जसे आशय आणि विषय भिडणारे असतात तसेच त्यांच्या चित्रपटातील भव्य दिव्य दृश्यही डोळे दीपवून टाकणारी असतात. त्यांचा 2002 साली त्यांचा जेव्हा देवदास चित्रपट आला तेव्हा त्या वर्षीची सगळ्यात महागडा चित्रपट होता तो. देवदास बनवायला त्यांनी 50 कोटी खर्च केले होते. तर देवदास चित्रपटातील वाडा दाखवण्यासाठी 12 कोटी रुपयांच्या काचेच्या तुकड्यांचा उपयोग करण्यात आला होता. तोच सिलसिला अगदी त्यांच्या रामलीला आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातही दिसून येतो आणि त्यांचे भव्यतेवरचं प्रेम कळू शकते.

अभिनेत्रींसाठी संजय म्हणजे सुखद धक्का

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाचे सूत्र आहे, सिनेमातील मुख्य स्त्री भूमिका, अभिनेत्रींना सौंदर्याच्या अत्युच्च पातळीवरुन कलात्मक पद्धतीने सादर करणे आणि भव्यतेबरोबरच मनातील प्रेम जाहीर करणे हिच त्यांच्या चित्रपटाची खासियत आहे, म्हणून संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेत्रीला सुखकारक आणि एक सुखद धक्का असतो.

संबंधित बातम्या

शिव तांडव स्त्रोत्रम् म्हणजे भक्ती, अध्यात्म आणि देवत्व; अमृता फडणवीसांच्या गाण्याची चाहत्यांना उत्सुकता

अखेर ‘गंगुबाई काठियावाडी’चा विजय; हायकोर्टाने फेटाळल्या चित्रपटाविरोधातील याचिका

Jhund Trailer: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.