मुलीच्या जन्मानंतर पतीने सोडली साथ, आयुष्यातील कठीण काळाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘त्या लोकांनी माझ्यासोबत…’

| Updated on: Apr 09, 2024 | 12:37 PM

Love Life | लग्नाच्या 9 वर्षांनंतर त्याने अभिनेत्री आणि लेकीची सोडली साथ, अनेक वर्षांनंतर अभिनेत्री म्हणाली, 'त्या लोकांनी माझ्यासोबत जे केल ते...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने केलेल्या वक्तव्याची चर्चा...

मुलीच्या जन्मानंतर पतीने सोडली साथ, आयुष्यातील कठीण काळाबद्दल अभिनेत्री म्हणाली, त्या लोकांनी माझ्यासोबत...
Follow us on

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली. अनेक वर्ष बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्रींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्न फार काळ टिकलं नाही… असंच काही झालं आहे, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री संजीदा शेख हिच्यासोबत. संजीदा हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री लवकरच ‘हिरामंडी’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना घायाळ करणाऱ्या संजीदा हिने खासगी आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आज अभिनेत्री तिच्या आयुष्यात आनंदाने जगत आहे. पण एककाळ असा होता, जेव्हा अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे त्रासलेली होती. संजीदा हिने 2012 मध्ये बॉयफ्रेंड आणि अभिनेता आमिर अली याच्यासोबत लग्न केलं. संजीदा आणि आमिर यांना एक मुलगी देखील आहे. मुलगी झाल्यानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.. अखेर लग्नाच्या दहा वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

संजीदा आणि आमिर यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला.. दोघांच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला… संजीदा हिने कधीच तिच्या खासगी आयुष्यांबद्दल खुलासा केला नाही. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, संजीदा हिने तिच्या आयुष्यात आलेल्या कठीण दिवसांबद्दल सांगितलं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘अनेक लोकं अशी आहेत, जे आता माझे मित्र नाहीत. पण मी त्यांच्यावर प्रेम करते. कारण ते माझ्या आयु्ष्यात नाहीत. त्यांच्याशिवाय मी एक उत्तम व्यक्ती आहे… मी आज प्रचंड आनंदी आहे. आयुष्यात काही असे अनुभव येतात ज्यामुळे आपण खूप काही शिकतो… तुम्हाला आयुष्यात खुप साऱ्या लोकांची गरज नाही… त्या लोकांनी माझ्यासोबत जे काही केलं ते फार चांगलं केलं…’

 

 

अभिनेत्रीच्या घटस्फोटानंतर तिच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये सुरु होत्या… यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या, तेव्हा मला कळलं माझ्याबद्दल एवढ्या चर्चा का रंगत आहेत. मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं… मी काही बोलली असती, तर आणखी चर्चा रंगल्या असत्या..’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजिदा हिची चर्चा रंगली आहे.