कुवैतमध्ये जन्म, लव्ह मॅरेजनंतर घटस्फोट, अनेक वादळं पचवून लोकप्रिय अभिनेत्री…
हीरामंडी वेबसीरिजमधील भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या संजीदा शेख यांच्या आयुष्याची ही कहाणी आहे. टीव्ही अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या संजीदांनी आमिर अलीशी लग्न केले होते आणि त्यांना एक मुलगी आहे. 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. आता सिंगल मदर असलेल्या संजीदांनी बॉलिवूड आणि ओटीटीमध्येही काम केले आहे.
यंदाची सर्वात सुपरहिट वेब सीरीज हीरामंडीमध्ये अनेक अभिनेत्रींनी काम केलंय. संजीदा शेख त्यापैकी एक आहे. टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख हिने अनेक रिॲलिटी शोमध्ये आणि सिनेमात काम केलं आहे. संजीदाने ओटीटीमध्ये आधीही काम केलंय. पण संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली. या सिनेमातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. संजीदाचा आज वाढदिवस आहे. संजीदा आज 40व्या वर्षात पदार्पण करतेय.
संजीदाच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमासारखीच आहे. तिने अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केलं होतं. त्यांचं हे लव्ह मॅरेज होतं. त्यांना एक मुलगीही झाली. पण दोन वर्षापूर्वीच संजीदाने तलाक घेतला. सध्या ती सिंगल मदर आहे.
संजीदाचं करिअर
20 डिसेंबर 1984 मध्ये कुवैत येथे संजीदा शेखचा जन्म झाला. तिची फॅमिली मूळची गुजरातच्या अहमदाबादमधील आहे. तिने 2003मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. दोन वर्ष तिने छोटेमोठे रोल केले. त्यानंतर 2005मध्ये निम्मो नावाची तिची सीरिअल आली. त्यात ती मुख्य अभिनेत्री होती. या सीरिअलमुळे तिला नाव मिळालं. त्यानंतर 2007मध्ये कयामत नावाची दुसरी सीरिअल आली. त्यात तिने एका वॅम्पचा रोल साकारला होता. ‘नच बलिए 3’च्या सीजनमध्ये तिने नवऱ्यासोबत एन्ट्री घेतली. तो सीजन या जोडीने जिंकला होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर संजीदा काही वर्षातच टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री झाली.
सिंगल मदर
2007मध्ये ‘क्या दिल में है’ ही तिची मालिका आली. या सीरिअलच्या निमित्ताने तिची भेट आमिर अलीशी झाली. त्याच्यासोबत ती लीड रोलमध्ये होती. त्यांची जोडी त्यावेळी लोकप्रिय ठरली. ही सीरिअल सुरू असतानाच दोघांमध्ये प्रेम जुळलं. 2012मध्ये संजीदाने आमिर अलीसोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी अनेक रिअॅलिटी शोमध्ये कामही केलं.
2018मध्ये संजीदा सरोगसीद्वारे आई बनली. त्यांना आयरा नावाची मुलगी झाली. 2020मध्ये संजीदा आमिरपासून वेगळी राहू लागली. 2022मध्ये दोघांचा तलाक झाला. आम्ही दोघांनी ठरवून तलाक घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तलाकनंतर मुलीचा ताबा संजीदाला मिळाला. आता सिंगल मदर म्हणून ती मुलीची देखभाल करत आहे.
सिनेमा आणि वेब सीरीज
अनेक टीव्ही सीरिअलमध्ये काम केल्यानंतर 2020मध्ये संजीदा बॉलिवूडमध्ये आली. तैश या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तिचा हिरो हर्षवर्धन राणे होता. त्याच वर्षी तिचा काली खुही नावाचा सिनेमा आला. हा सिनेमा नेटफिलिक्सवर रिलीज झाला होता. 2024मध्ये ती फाइटर या सिनेमात दिसली होती.