‘मी अक्षय खन्नाचा फॅन’, संतोष जुवेकरने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर
अभिनेता संतोष जुवेकर हा सध्या चर्चेत आहे. त्याने 'छावा' सिनेमातील अक्षय खन्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता यावर अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक सुरहिट चित्रपटांचे कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना येसुबाईंच्या भूमिकेत दिसत आहे आणि अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार दिसले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी या भूमिकेत दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये संतोष म्हणाला होता की ‘मी अक्षय खन्नाशी सेटवर बोललोच नाही.’ त्यानंतर संतोष जुवेकरला तुफान ट्रोल केले जात होते. आता यावर संतोषने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला होता संतोष जुवेकर?




संतोष जुवेकरने एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीमध्ये, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही” असे म्हटले होते. त्यानंतर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता.
Video: घटस्फोटीत अभिनेता पडला प्रेमात, गर्लफ्रेंडला नको तिकडे रंगलावताना पाहून संतापले नेटकरी
View this post on Instagram
आता संतोषने होळी निमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षय खन्नाबाबातच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली आहे ना पण जी गोष्ट नाहीना ती मला सांगायची आहे. कारण तो राग फक्त त्या भूमिकेचा होता. मी अक्षय खन्नाचा तेवढाच फॅन आहे. ही सारवासारव नाहीये. तुम्हाला जर असे वाटत असेल तर आयची जय. पण खरच माझं प्रेम आहे. आणि इतक्या तनमयतेने त्या माणसाने काम केले आहे ना की त्याचा राग यावा. लहानपणी आपली आई किंवा आजी निळूफुले असतील किंवा ज्यांनी कोणी, त्यांना शिव्या द्यायचे. हा नालायक. ते त्या कॅरेक्टरसाठी होते. त्या माणसाची ती पावती होती. पुरुष नाटकात नाना पाटेकरांना नाटक सुरु असताना एका बाईने चप्पल फेकून मारली होती. नानांती परत केली नाही. ती चप्पल पावती म्हणून जपून ठेवली’ असे संतोष म्हणाला.
छावा सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.