Sapna Choudhary : बॉलिवूड अभिनेत्रींचंही जे स्वप्न राहतं अधूर ते सपना चौधरीचं झालंय पूर्ण, पाहा नेमकं काय होतं?
अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांच्या ग्लॅमरस लुकने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेत्रींसोबत यंदा हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनेही एक पोझ अन सर्व झाले फिदा!
मुंबई : कान्स फिल्म फेस्टिवल 2023 मध्ये जाण्याचं प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. तसंच या फेस्टिवलमध्ये दरवर्षी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सहभागी होताना दिसतात. यंदाही अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनी त्यांच्या ग्लॅमरस लुकने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेत्रींसोबत यंदा हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. सपनानं कान्सच्या रेड कार्पेटवर तिचा सौंदर्यानं सर्वांनाच भूरळ पाडली. सध्या सपनाचे हे रेड कार्पेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सपना चौधरी ही सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या शोमधून चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. सपनाचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. तसंच सपनाचं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न होतं. तर आता सपनाचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. सपनानं कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या ग्लॅमरस लूकनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.
नुकतेच सपनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कान्सच्या रेड कार्पेटवरील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी सपना ओम बाई भारती आणि आशना यांनी डिझाइन केलेल्या सुंदर आउटफिटमध्ये दिसत आहे. विशेष सांगायचं झालं तर, सपनानं परिधान केलेल्या गाऊनचे वजन जवळपास 30 किलो आहे.
सपनानं कान्सच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “कान्स 2023 मध्ये पदार्पण केलं. स्वप्नं ही खरोखरच सत्यात उतरतात. हा प्रवास खूप मोठा होता. कठोर परिश्रम, त्याग आणि दृढ निश्चयाने भरलेला असा हा प्रवास होता. हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल सर्वांचे आभार.”
View this post on Instagram
सध्या सपनाचे कान्सच्या रेड कार्पेटवरील हे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तिचा नमस्ते केलेला फोटो चांगलाच चर्चेत आहे. या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात दर्शवली आहे. तसंच सपनाला कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केल्याबद्दल अनेक सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.