बापाच्या काळजीने मुलांची अवस्था वाईट,सारा-इब्राहिम अस्वस्थ; कारमधून घाईत उतरले अन्… , व्हिडीओ व्हायरल

सैफ अली खान वरील हल्ल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान त्याचे मुलं सारा आणि इब्राहिम अली खान हे देखील प्रचंड अस्वस्थ असल्याचं दिसून येत आहे. वडिलांच्या काळजीने दोघेही चिंतेत असल्याचं दिसून येत आहे.  दोघांचाही हॉस्पिटलमध्ये जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात दोघांचीही काळजीने झालेली वाईट अवस्था दिसत आहे. 

बापाच्या काळजीने मुलांची अवस्था वाईट,सारा-इब्राहिम अस्वस्थ; कारमधून घाईत उतरले अन्... , व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 2:17 PM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे (16 जानेवारी, 2025) मुंबईतील त्याच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान या घटनेनंतर अनेक सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचंही त्यांनी म्हटल आहे. दरम्यान ही घटना समजताच अनेकजण हॉस्पिटलमध्ये सैफची विचारपूस करण्यासाठी गेल्याचही समोर आलं आहे.

सारा आणि इब्राहिमची अस्वस्थता कॅमेऱ्यात कैद

सैफला रुग्णालयात दाखल केल्यानंतर करीनाचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती अतिशय घाबरलेल्या अन् गोंधळेल्या अवस्थेत दिसत आहे. तर आता सैफच्या दोन्ही मुलांचा म्हणजे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचाही हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे.

वडिलांच्या काळजीने लेक अन् मुलगा चिंतेत

या व्हिडीओमध्ये इब्राहिम आणि सारा घाई-घाईत आपल्या कारमधून उतरून धावत हॉस्पिटलच्या आत जाताना दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर वडिलांची काळजी आणि चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच या व्हिडीओवरून लेक अन् मुलगा वडिलांच्या काळजीने अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे.

सैफला शरीरावर गंभरीर जखमा

दरम्यान सैफला शरीरावर 6 ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन यशस्वी झालं असून त्याती प्रकृती आता स्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.

मोलकरणीपासून ते घरातील इतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची कसून चौकशी

तसेच हल्ला करणारा या अज्ञात व्यक्तीला शोधण्याचा पोलिस पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तसेच इतरांचीही चौकशी सुरु आहे. मोलकरणीपासून ते घरातील इतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोलिस सर्वांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान पोलिसांनी हा अज्ञात व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशानेच घरात घुसल्याचं सांगितलं आहे. तरी याबाबत अधिक तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.