“आपल्या डोळ्यात फक्त लाज आणि…’ आजी शर्मिला टागोर यांच्याबद्दल सारा अली खान असं का म्हणाली?
अभिनेत्री सारा अली खान तिच्या आजी शर्मिला टागोरच्या आयकॉनिक बिकिनी लूकबद्दल एका कार्यक्रमात स्पष्टच बोलली. तसेच साराने पतौडी कुटुंबाचा उल्लेख करताना, अभिनेत्री म्हणाली की आम्हाला लहानपणापासूनच काही गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत ज्या मला माझ्या कुटुंबाबद्दल सर्वात जास्त आवडतात.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या वैयक्तिग आयुष्याबद्दलही कायम चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती म्हणजे तिने तिच्या आजीबद्दल केलेल्या एका वक्तव्याबद्दल. एका कार्यक्रमादरम्यान, साराने तिच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि आगामी प्रकल्पांबद्दल मोकळेपणाने सांगितलं. एका फिल्मी कुटुंबातील सारा अली खानने तिचे वडील सैफ अली खान आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला . यासोबतच, साराने तिची आजी शर्मिला टागोरचा प्रसिद्ध बिकिनी सीनबद्दलही वक्तव्य केलं आहे. हा सीन तिने जेव्हा पाहिल्यांदा पाहिला तेव्हा तिला कसं वाटलं याबद्दल तिने सांगितलं.
“मग ते माझ्या आजीने बिकिनी घातलेले…”
सारा अली खानने पतौडी कुटुंबाचा उल्लेख करताना म्हटलं की, “माझ्या कुटुंबात मला काय आवडतं हे तुम्हाला माहिती आहे आणि ते कठीण आहे पण त्यात आधुनिकता आणि पारंपारिकता दोन्हीचे मिश्रण आहे, मग ते माझ्या आजीने बिकिनी घातलेले का असेनात. मला वाटतं त्यात वाईट असं काहीच नाहीये. आपली परंपरा फक्त साडी किंवा सलवार कमीजमध्येच दिसत नाही, जरी मला जाहिरातीत शॉर्ट स्कर्ट घालावा लागला आणि मी हेअर रिमूव्हल क्रीमची जाहिरात केली तरी मला माझे पाय दाखवावे लागतात कारण त्यावेळी ते माझे काम असतं, परंतु मला वाटतं की तुम्ही तुमच्या डोळ्यांत आणि तुमच्या देहबोलीत तुमची नम्रता राखता आणि मला हे अगदी लहानपणापासूनच शिकवले गेले आहे.” असं म्हणत तिने तिचं मत स्पष्ट केलं आहे.
Sara Ali Khan opened up about what it’s like working with her parents, sharing her experiences and insights on collaborating with them.#saraalikhan #TNSummit2025 #TimesNowSummit25 #KeepingBharatAhead pic.twitter.com/xfqzraQa7y
— @zoomtv (@ZoomTV) March 27, 2025
सैफने विचारलं ही माझीच मुलगी आहे ना…
सारा अली खानने वडील सैफ अली खानसोबत काम केल्याचाही उल्लेख केला. तिला विचारण्यात आलं की तिचे वडील सैफ अली खानसोबत काम करण्यात काही अडचण येते का? साराने त्यावेळी एका घटनेचा उल्लेख करत म्हटलं, “जेव्हा आम्ही एका जाहिरातीचे चित्रीकरण करत होतो आणि मी तयार होऊन आले, तेव्हा माझ्या वडिलांनी मला पाहिलं आणि म्हणाले, ही माझीच मुलगी आहे का? साराने हसून उत्तर दिलं की आपल्याला एकत्र काम करण्यास काहीही अडचण नाही”. दरम्यान सारा आणि सैफचे नाते लेक-वडील म्हणून तर सुंदर आहेच पण त्यांच्यात एक मैत्रीपूर्ण नातं पण आहे.