Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Ali Khan | बाईंनी शिक्षा केली वाटतं… सारा अली खानचा नवा फोटो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्सना उधाण

यावेळी व्होग इंडियाने अभिनेत्री सारा अली खान हिला कव्हर पेजवर स्थान दिले आहे. या नव्या फोटोशूटमध्ये सारा खूप सुंदर दिसत आहे

Sara Ali Khan | बाईंनी शिक्षा केली वाटतं... सारा अली खानचा नवा फोटो पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्सना उधाण
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 4:48 PM

Sara Ali Khan New Picture : ‘केदारनाथ’ चित्रपटातून डेब्यू करत अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan ) हिने सर्वांनाचा धक्का दिला होता. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसाही झाली होती. त्यानतर तिच्या करीअरचा ग्राफ चढता दिसत असून जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. सारा नुकतीच व्होग मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली.

त्यामध्ये ती हिरवा ड्रेस, कपाळावर टिकली अशा लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ती नेहमी तिच्या लूक्सबाबत वेगवेगळे प्रयोग करत असते. त्याचप्रमाणे तिच्या या लूकचीही बरीच चर्चा होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. मात्र काही युजर्सना तिचा हा नवा एक्सपेरिमेंट बिलकूल आवडलेला नाही. या फोटोशूटला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.

साराला मिळाल्या संमिश्र प्रतिक्रिया

साराने नुकतेच वोग इंडियाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहे. त्याचाच एक फोटो तिने नुकताच शेअर केला आहे. ज्यामध्ये सारा हिरव्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे. तसेच तिने टिकलीही लावली आहे. व्होगने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by VOGUE India (@vogueindia)

अनेक लोकांना साराच्या या फोटोचे कौतुक केले आहे तर काहीनंना हा लूक आवडलेला नाही. या फोटोंवर कमेंट करताना नेटकऱ्यांच्या प्रतिभेला अक्षरश: उधाण आले आहे. ‘जेव्हा टीचर तुम्हाला हात वर करून उभं रहायची शिक्षा देतात तेव्हा’ अशी कमेंट एका युजरने या फोटोवर केली आहे.

‘ तर त्यांनी (व्होगने) अप्सरा आली खान असं लिहायलं हवं होतं’ अशी मजेशीर कमेंटही एकाने लिहीली आहे. बऱ्याच लोकांना साराचा हा आऊटफिट आवडला नसून त्याच्या लूझ (सैल) ड्रेपिंगबद्दलही अनेकांनी टीका केली आहे.

मात्र काही युजर्सना तिचा हा लूक आणि पोझ आवडली असून अनेकांनी तिची तुलना ताल चित्रपटातील ऐश्वर्याशी केली आहे. ‘ कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं ? ‘ असा प्रश्न विचारत एकाने साराच्या सौंदर्याचे मनमुराद कौतुक केले आहे.

कामाबाबात बोलायचं झालं तर सारा लवकरच अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी तिचा विकी कौशल सोबतचा जरा हटके जरा बचके चित्रपट रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.