Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा शौकीन सारा पोहोचली ‘सैफ चायवाला’ स्टॉलवर, छोट्या नवाबसाठी शेअर केला खास मेसेज!

साराने चक्क चहाच्या टपरीवर जात, वडील सैफ अली खान विषयी प्रेम व्यक्त केले आहे. साराला ‘पापा’ सैफवर आपले प्रेम व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग सापडला आहे. साराने आपल्या इंस्टा स्टोरीवर आपला हा खास फोटो शेअर केला आहे.

चहा शौकीन सारा पोहोचली ‘सैफ चायवाला’ स्टॉलवर, छोट्या नवाबसाठी शेअर केला खास मेसेज!
सारा अली खान
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 10:55 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. दर दिवशी ती  चाहत्यांसाठी आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. एवढेच नाही तर सारा शायरी देखील शेअर करते असते. आज साराने चक्क चहाच्या टपरीवर जात, वडील सैफ अली खान विषयी प्रेम व्यक्त केले आहे. साराला ‘पापा’ सैफवर आपले प्रेम व्यक्त करण्याचा एक अनोखा मार्ग सापडला आहे. साराने आपल्या इंस्टा स्टोरीवर आपला हा खास फोटो शेअर केला आहे (Sara Ali Khan shares photo from saif chai wala stall goes viral on internet).

सारा अली खानने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका चहाच्या स्टॉलच्या बाहेर बसली आहे. त्या चहाच्या स्टॉलचे नाव आहे ‘सैफ चाय वाला’. या टपरी बाहेर सारा एथनिक लूकमध्ये फोटो पोज करताना दिसत आहे. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे आणि त्याला बाऊंड केले आहे. हा फोटो शेअर करताना साराने लिहिले की, ‘मला माझे वडील खूप आवडतात’.

साराची इन्स्टा स्टोरी :

Sara Ali khan

सारा आली खान

‘अतरंगी रे’चे शूटिंग झाले पूर्ण

सारा अली खानने अलीकडेच तिच्या आगामी ‘अत्रंगी रे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर साराने अक्षय कुमार, धनुष आणि दिग्दर्शक आनंद एल राय यांच्यासह फोटो शेअर करून भावनिक पोस्ट शेअर केली. साराने फोटो शेअर केले आणि लिहिले की, ‘चित्रपटाचे शूटिंग संपले आहे. एका वर्षानंतर. आनंद एल रॉय सर मला ही भूमिका, चित्रपट आणि संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप प्रेम, समर्थन करण्यासाठी, भारत भ्रमंती करू दिल्याबद्दल, चवदार अन्न खायला दिल्याबद्दल, सूर्योदय होताच गाडी चालवून त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आणि संध्याकाळ सुफी जिंजर वॉटर देण्यासाठी…खूप आभार. हे वर्ष सर्वोत्कृष्ट टीमसह संस्मरणीय होते.’ तसेच, तिने या पोस्टमध्ये अक्षय कुमार आणि धनुष यांचे आभार मानले आहेत (Sara Ali Khan shares photo from saif chai wala stall goes viral on internet).

नाईट ड्रेसमध्ये शेअर केले फोटो

साराने अलीकडेच सोशल मीडियावर आराम करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोत सारा रेड नाईट सूटमध्ये दिसली आहे. झोपलेली सारा हातात पुस्तक वाचताना दिसली होती. तसेच काही खाद्यपदार्थही तिच्या जवळ पडलेले दिसले. फोटो शेअर करताना साराने छान कॅप्शनही लिहिले आहे. साराचा हा फोटो खूप चर्चेत आला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सारा शेवटची ‘कुली नंबर 1’ चित्रपटात वरुण धवनसोबत दिसली होती. आता ती लवकरच ‘अतरंगी रे’मध्ये दिसणार आहे. साराकडे या दिवसांमध्ये कोणतेही विशेष प्रोजेक्ट नाहीत.

(Sara Ali Khan shares photo from saif chai wala stall goes viral on internet)

हेही वाचा :

सलमान ते सारा, ‘देवमाणूस’ मालिकेतील मायराचे सुपरस्टार कनेक्शन, मिमीचार्वी खडसेचा अनोखा अंदाज

Video | ‘तेनु ले के मै जावांगा, दिल दे के मै जावांगा’,  होणाऱ्या बायकोसाठी नवऱ्याचा अफलातून डान्स, पाहा व्हिडीओ…

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.