‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.
पुणे स्थित व्यावसायिक रोनित पिसेशी कार्तिकीचा विवाह संपन्न झाला.
मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला.
कार्तिकीच्या लग्नासाठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, गायिका आर्या आंबेकर आणि मुग्धा वैशंपायन यांची खास उपस्थिती दिसली.
तिघींनीही सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातले खास क्षण चाहत्यांशी शेअर केले आहेत.
‘सारेगमप लिटिल चॅम्प’मधील स्पर्धक आणि गायिका मुग्धा वैशंपायन हिने कार्तिकीसोबत खास फोटो शेअर केला आहे.