Mangli song : गाणं कळत नाही, पण तरीही ऐकायला भारी वाटतंय, मराठी श्रोते या तेलुगु गाण्याच्या प्रेमात का?
महाराष्ट्रातील अनेकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर मंगली हिनं गायलेले गीत दिसतेय. Sathyavathi Mangli Kanne Adirindi
मुंबई: कोणत्याही कलाकृतीला भाषा, प्रातं कशाचही बंधन नसतं असं म्हटलं जातं. असंच काहीसं सध्या घडत आहे. महाराष्ट्रातील अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक गाण दिसतेय. हे गाणं नेमकं कुठलं आहे हे देखील त्यांना माहिती नाही. पण, मराठी श्रोते त्या गाण्याच्या प्रेमात पडलेत, असं दिसतं. हे गाणं सत्यावथी मंगली (Sathyavathi Mangli) या तेलुगु गायिकेनं गायलं आहे. मराठी श्रोते तेलुगु गाण्याच्या प्रेमात का पडलेत हे तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत. ( Sathyavathi Mangli sung Kanne Adirindi viral in Maharashtra many social media users share video)
हे गाणं नेमकं कोणत्या भाषेतील आहे?
दाक्षिणात्य अभिनेता दर्शनचा ‘रॉबर्ट’ हा सिनेमा काही दिवंसामध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कन्नड आणि तेलुगु या भाषेत प्रदर्शित होईल. हे गाणं नेमकं कोणत्या भाषेतील हे लोकांना माहिती नाही पण ते मोठ्या प्रमाणावर पसंत करत आहेत. नुकताच या सिनेमाचा प्रीलाँचिंग सोहळा पार पडला. यामध्ये तेलुगु गायिका सत्यावथी मंगली (Sathyavathi Mangli) हीनं ‘कन्ने अधिरीनीधी’ (Kanne Adirindi) हे तेलुगु भाषेत गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ महाराष्ट्रातील सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या स्टेटस आणि फेसबूक पोस्टवर दिसत आहे. हे गाण तेलुगु आणि कन्नड सिनेमातील असूनही महाराष्ट्रातील लोकांनी पसंत केलं आहे. या गाण्याला आतापर्यंत 3 कोटी 40 लाख 17 हजार 593 व्हिव्ज मिळाले आहेत.
गाण्याचा व्हिडीओ
सत्यावथी मंगली कोण आहे? (Sathyavathi Mangli)
सत्यावथी मंगली ही तेलुगु गायिका आणि सूत्रसंचालक आहे. मंगली 2017 पासून तेलुगु मधील टीव्हीवर आणि सिनेमामध्ये काम करते. तिने अल्लू अर्जूनच्या चित्रपटासाठी देखील पार्श्वगायनं केलेलं आहे. ‘कन्ने अधिरीनीधी’ हे तेलुगु लोकगीत असून त्यामध्ये एका युवतीची तिच्या तरुण मित्राबद्दलची भावना व्यक्त करण्यात आली आहे. कन्नड सिनेमासाठी श्रेया घोषाल हिनं हे गीत म्हटलं आहे. सत्यावथी मंगली हिनं हे गीत हैदराबाद येथील रॉबर्ट सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच्या कार्यक्रमात म्हटलं असून सिनेमा 11 मार्चला प्रदर्शित झाला आहे.
संबंधित बातम्या :
पैशाला पैसे लावत, प्रियंकाची आणखी एक गरुडझेप ! अमेरिकेत खास भारतीय नावाचं ‘इंडियन रेस्टॉरंट’
टिनपाटच्या डब्यावर ताल शिकले, इराण्याच्या हॉटेलबाहेर गाणं; असे घडले विठ्ठल शिंदे!
( Sathyavathi Mangli songs Kanne Adirindi viral in Maharashtra many social media users share video)