Satish Kaushik : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाची चर्चा आहे.
सतीश कौशिक मित्रांसोबत होळीचा आनंद घेण्यासाठी गुरुग्राम याठिकाणी पोहोचले होते. याच दरम्यान रात्री सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सतीश कौशिक यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी कौशिक त्यांना मृत घोषित केलं.
आता पोलीस सतीश कौशिक यांच्या निधनानंतर चौकशी करत आहेत. सतीश कौशिक यांचं शवविच्छेदन झालं आहे. आता त्यांच्या पार्थिव शरीराला मुंबई येथे आणणार आहे.. तर दुसरीकडे सतीश कौशिक याचे मॅनेजर संतोष राय यांनी त्या दिवशी फार्महाऊसमध्ये नक्की काय झालं याबद्दल पोलिसांना माहिती दिली आहे.
संतोष राय म्हणाले, ‘सतीश कौशिक, पुष्पांजली यांच्या फार्महाऊसमध्ये पार्टी करत होते. मध्यरात्री त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होवू लागला… त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयाच्या गेटवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला…’ अशी माहिती मॅनेजरने पोलिसांना दिली आहे.
सतिश कौशिक यांच्या निधनानंतर आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन दिल्ली येथील दीन दयाल रुग्णालयात मेडिकल बोर्ड यांच्याद्वारे करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सतीश कौशिक यांच्या निधनाची वेळ, त्यांनी कोणते पदार्थ खाल्ले होते किंवा काय प्यायले होते? यासर्व गोष्ट स्पष्ट होतील. शिवाय सतीश यांना रुग्णालयात दाखल केलं त्यांच्या संपर्कात देखील पोलीस आहेत.
सतीश कौशिक यांना करियरमध्ये प्रचंड स्ट्रगल करावं लागला. १९८० साली सतीश कौशिक यांनी करियरला सुरुवात केली. पण त्यांना लोकप्रियता १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील कॅलेंडर या भूमिकेतून मिळाली. कॅलेंडर या भूमिकेमुळे सतीश कौशिक प्रसिद्धीझोतात आले. पण अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.