VIDEO : अमिताभचा फोटो पाहून रेखा पाहा काय म्हणाली….!

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून बाजूला होताना दिसतात. फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर इव्हेंटदरम्यान हा प्रकार घडला.  रेखा  फोटोग्राफर्सना पोज देत होत्या, त्याचवेळी त्यांनी मागे वळून पाहिलं असता, त्यांना बॅकग्राऊंडला अमिताभ यांचा फोटो […]

VIDEO : अमिताभचा फोटो पाहून रेखा पाहा काय म्हणाली....!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रेखा बिग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून बाजूला होताना दिसतात. फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर इव्हेंटदरम्यान हा प्रकार घडला.  रेखा  फोटोग्राफर्सना पोज देत होत्या, त्याचवेळी त्यांनी मागे वळून पाहिलं असता, त्यांना बॅकग्राऊंडला अमिताभ यांचा फोटो दिसतो आणि त्या तातडीने तिथून बाजूला निघून जातात.

व्हिडीओ

अमिताभ आणि रेखा यांची जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी होती. या दोघांच्या नात्याबद्दल सर्वांना सर्वश्रृत आहे. बऱ्याच वर्षांपासून या दोघांच्या नात्याबद्दल सर्वत्र बोललं जातं. मात्र यावर आजपर्यंत अमिताभ आणि रेखाने बोलणं टाळलं आहे. दोघांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट केले आहेत.

डब्बू रत्नानीच्या कार्यक्रमात रेखा मनमोकळेपणे फोटोग्राफर्सना पोज देत होत्या. मात्र अचानक रेखा अमिताभ यांचा फोटो पाहून तिथून बाजूला गेल्या. यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये रेखा आणि अमिताभवर चर्चा सुरु झाली आहे.

‘सिलसिला’ हा अमिताभ आणि रेखा यांचा शेवटचा चित्रपट आहे. त्यानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. आतापर्यंत अनेकदा दोघांच्या नात्यांबद्दल वृत्तपत्रातून, मॅगझीनमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र दोघांनी कधी आपल्या नात्याबद्दल कबुली दिली नाही. आजही अनेक चाहते त्या दोघांना एकत्र चित्रपटात पाहण्यासाठी इच्छुक आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.