मुंबई : अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. राज मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ट्विटरवर अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकऱ्यांनी असंही म्हटलंय की यापेक्षा एखादा साऊथचा चित्रपट ओटीटीवर पाहून घ्या. अक्षय कुमारचे चाहते त्याच्या चित्रपट निवडीवर नाराज झाले आहेत. तुम्ही जर थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर आधी ‘सेल्फी’चा ट्विटर रिव्ह्यू काय म्हणतोय, ते जाणून घ्या..
सेल्फी हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या कॉमेडी ड्रामाची निर्मिती करण जोहरने केली आहे. या चित्रपटात अक्षयने एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. या सुपरस्टारसोबत एक सेल्फी क्लिक करण्याची विनंती त्याचा चाहता करतो, मात्र त्यादरम्यान असं काही घडतं, ज्यामुळे सगळा गोंधळ उडतो. यात नंतर मीडियासुद्धा सहभागी होते आणि हा लढा एक सुपरस्टार विरुद्ध चाहता असा होतो. सेल्फी हा मल्याळम चित्रपटाचा रिमेक असला तरी हा ‘फ्रेम बाय फ्रेम’ कॉपी केलेला नाही.
As a #AkshayKumar? fan I’m feeling very angry and total disappointed ☹️?????#SelfieeReview – Time Waste
Sir don’t do this type of moviesRating – 1/5 ⭐
As a fan it hurts sir ❤️ pic.twitter.com/kvVBiRhKuc
— HP (@JaiShreeRam_8) February 24, 2023
Finished watching #AkshayKumar & #EmraanHashmi starrer last night – #Selfiee. One word – Dull & Flat.@akshaykumar is total misfit as superstar Vijay because he isn’t a superstar in the first place..
Weak screenplay,directionWill be a disaster at the BO!
1.5/5! #SelfieeReview pic.twitter.com/X3FNPWbevs— DUNIYA ? (@cine_ki_duniya) February 24, 2023
Watching First Day First Show of #Selfiee , sorry it’s #DrivingLicence ??
Don’t waste your money for #AkshayKumar film , Go watch the original South film on OTT.#SelfieeReview pic.twitter.com/FoYi94y7UE— GAURAV (@mtriderz) February 24, 2023
#SelfieeReview
ONE WORD REVIEW
DISASTER
Rating : ⭐️1/5 ?
It’s a waste, Akshay doesn’t stand to the knees of Sukumaran. You can copy a movie by the scenes at the most, but the talent is incomparable. You might like it but nothing is originalIn short a very bad remake pic.twitter.com/syCqgolQIF
— HP (@JaiShreeRam_8) February 24, 2023
गेल्या वर्षांत अक्षयचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यापैकी एकाही चित्रपटाने विशेष कमाई केली नाही. रक्षा बंधन, राम सेतू, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. तर कटपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.