Shabana Azmi | ठकांनी अभिनेत्रीलाही सोडलं नाही, शबाना आझमी यांच्या नावाने मोठा हात मारण्याचा डाव; पोलिसांत तक्रार

शबाना आझमी यांच्या नावे एक व्यक्ती ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रयत्न करत होती. हे लक्षात येताच शबाना यांनी सोशल मीडियावरून ही माहिती शेअर करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Shabana Azmi | ठकांनी अभिनेत्रीलाही सोडलं नाही, शबाना आझमी यांच्या नावाने मोठा हात मारण्याचा डाव; पोलिसांत तक्रार
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 11:59 AM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) सध्या बऱ्याच चर्चेत आहेl. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कोतुक झाले. या चित्रपटात त्या आलिया भट्टच्या आजीची भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धमाल करत आहे. याचदरम्यान शबाना आझमी यांनी सोशल मीडियावरून एक मोठा खुलासा केला आहे.

एक व्यक्ती, त्यांच्या नावे फसवणूक करण्याच प्रयत्न करत असल्याचे शबाना यांनी सांगितले. माझ्या नावाचा गैरवापर करून फिशिंग करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्यांनी नमूद केले. ट्विटरवरून त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती देत सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अशा पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे (शबाना आझमी) यांच्या नावाने येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजवर कोणीही विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय केले ट्विट ?

मंगळवारी शबाना आझमी यांनी ट्विटरवरून याबद्दल पोस्ट केले आहे. ‘ माझ्या नावाने काही मेसेज माझ्या सहकाऱ्यांना आणि परिचितांना पाठवले जात असल्याचे आमच्या नुकतेच लक्षात आले आहे. हे स्पष्टपणे फिशिंग आहे. कृपया अशा मेसेज आणि कॉलवर क्लिक करू नका किंवा कोणतेही उत्तर देऊ नका. आम्ही पोलिसांत तक्रार  करत आहोत. +66987577041 आणि +998917811675 या क्रमांकावरून असे संदेश पाठवले जात आहेत.’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दोन वर्षांपूर्वी आझमी यांचीच झाली होती फसवणूक

दोन वर्षांपूर्वी शबाना आझमी स्वतः ऑनलाइन फसवणुकीच्या बळी ठरल्या होत्या. खरंतर त्यांनी ऑनलाइन मद्याच्या होम डिलिव्हरीसाठी ॲडव्हान्स पेमेंट केले होते. मात्र बराच काळ उलटूनही त्यांना डिलीव्हरी मिळाली नव्हती, तेव्हा त्या ऑनलाइन पेमेंट स्कॅमला बळी पडल्याचे समोर आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.