सावत्र मुलगा फरहान, मुलगी झोया यांच्यासोबतच्या नात्याबद्दल शबाना आझमी यांचा पहिल्यांदाच खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांची सावत्र मुलं फरहान आणि झोया यांच्यासोबत त्यांचं नातं कसं आहे, याचा खुलासा केला आहे. तसेच जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणींबद्दलही त्या बोलल्या आहेत.

सावत्र मुलगा फरहान, मुलगी झोया यांच्यासोबतच्या नात्याबद्दल शबाना आझमी यांचा पहिल्यांदाच खुलासा
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 2:38 PM

Shabana Azmi on Farhan And Zoya : अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) दीर्घकाळापासून बॉलिवूड जगतात सक्रिय आहेत. त्या त्यांच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या खणखणीत अभिनयाने त्यांनी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान मिळवले आहे. शबाना या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंदी आहेत आणि पती जावेद अख्तरसोबत (Javed Akhtar) खास बॉन्ड शेअर करतात. जावेद अख्तर यांची मुलं फरहान आणि झोयासोबत त्यांचं नातं, बॉन्डिंग कसं आहे , याबाबत त्यांनी नुकताच खुलासा केला आहे .

जावेद अख्तर यांनी पहिले लग्न अभिनेत्री हनी इराणीसोबत केले होते. त्यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर अशी दोन मुले आहेत. फरहान आणि झोया हे दोघेही आज इंडस्ट्रीतील मोठी नावं आहेत आणि त्यांच्या पायावर उभी आहेत. शबाना आझमी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सावत्र आई असूनही फरहान आणि झोयासोबत त्यांचं बॉन्डिंग खूप खास आहे.

फरहानसोबतच्या बाँडिंगवर शबानाने काय म्हणाल्या ?

शबाना म्हणाल्या की, आमचे खूप मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मैत्री आणि विश्वासाच्या बळावर आमचे नाते खास आहे. मी देखील त्यांचा खूप आदर करतो आणि मला वाटते की ते दोघेही माझा खूप आदर करतात. याचे अधिक श्रेय मला त्याची आई हनी इराणी यांना द्यायचे आहे. हा हनी यांच्या उदारतेचा परिणाम आहे की त्यांची मुलं माझ्याशी प्रेमाने वागतात. जर हनी दयाळू नसती तर कदाचित तिची मुलं माझ्याशी कधीच बोलली नसती.

हनी यांच्यासोबतही आहे खास नातं

शबाना पुढे म्हणाल्या की, त्या हनी यांची आभारी आहे. त्यांच्यामुळेच शबाना या फरहान आणि झोयाच्याच नाही तर स्वतः हनीच्याही जवळ येऊ शकल्या. आमचे बाँडिंगही खूप खास आहे. आमच्या दोघांची खास गोष्ट म्हणजे आम्ही कधीच एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. जर एखाद्या विषयाव हनी यांना बोलायची इच्छा नसेल तर मी देखील त्याबद्दल बोलत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.